घाना: आफ्रिकन देश घानाने अधिकृतपणे मारबर्ग व्हायरसचे दोन रुग्ण सापडल्याची माहिती आता जगजाहीर केली आहे. मारबर्ग हा व्हायरस इबोलासारखाच एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, घानाने अत्यंत संसर्गजन्य मारबर्ग व्हायरस रोगाच्या पहिल्या दोन रुग्णांबाबत पुष्टी केली आहे. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा घानाच्या दक्षिण प्रांतात दोन लोकांचा मृत्यू झाला जे नंतर मारबर्ग व्हायरसने पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
काय आहेत लक्षणे?
डब्ल्यूएचओने सांगितले की, या रुग्णांमध्ये अतिसार, ताप, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणे पाहायला मिळाली. मारबर्ग विषाणू हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. ज्यामुळे रक्तस्रावी ताप येतो. यामध्ये मृत्यूदर हा तब्बल 88 टक्क्यांपर्यंत आहे. डब्ल्यूएचओच्या मते, इबोला विषाणूची उत्पत्ती त्याच विषाणूमुळे झाली आहे. अचानक ताप, तीव्र डोकेदुखी आणि अस्वस्थता ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असल्याचे WHO च्या निवेदनात म्हटले आहे.
अधिक वाचा: झिंकच्या कमतरतेने मृत्यू येतो जवळ; दीर्घायुषी व्हायचं असेल तर खा ‘हे’ 10 पदार्थ
कसा पसरतो हा घातक व्हायरस?
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, हा विषाणू वटवाघळांपासून लोकांमध्ये पसरतो आणि शरीरात झालेल्या जखमांमधून पाण्याद्वारे इतर मानवांना संक्रमित करतो. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, घानामधील उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत आणि अधिक संसाधने तैनात केली जातील. तात्काळ आणि निर्णायक कारवाई न केल्यास मारबर्ग हा सहज हाताबाहेर जाऊ शकतो असा इशाराही डब्ल्यूएचओने दिला आहे.
WHO ने लोकांना दिला सल्ला
मारबर्ग विषाणूसाठी कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा अँटीव्हायरल उपचार नाही. तथापि, तोंडी किंवा रिहायड्रेशन आणि विशिष्ट लक्षणांवर उपचारांसह, काळजी घेऊन रुग्णांवर उपाय केले जाऊ शकतात. घानाच्या आरोग्य सेवेने घानाच्या जनतेला वटवाघळांनी व्यापलेल्या खाणी आणि गुहा येथे जाण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे. तसेच व्हायरस पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी खाण्यापूर्वी मांसाहारी पदार्थ पूर्णपणे शिजवून घ्यावेत.
अधिक वाचा: भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण केरळमध्ये
पश्चिम आफ्रिकेत मारबर्ग विषाणूच्या रुग्णांची पुष्टी होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी गिनीमध्ये एक रुग्ण आढळला होती. परंतु, या रुग्णाबाबत पुष्टी झाल्यानंतर पाच आठवड्यांनंतर, सप्टेंबरमध्ये गिनी सरकारने तो उद्रेक संपल्याची घोषणा केली होती. त्याच वेळी, WHO म्हणते की आफ्रिका, अंगोला, काँगो केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये या विषाणूच्या तुरळक रुग्णांची पुष्टी झाली आहे.