मास्कने अनेक वर्षांपासून मनुष्याला वाचवलं ; मास्कचा इतिहास आहे अनेक शतके जुना

जगभरात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन(Lockdown) करण्यात आला आहे.

mask savemask saved man for many years Read the history of the maskd man for many years
मास्कने अनेक वर्षांपासून मनुष्याला वाचवलं  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मास्कने मनुष्याचा प्रदूषण,विषारी वायू आणि महामारींच्या संक्रमणापासून  बचाव केला
  • जागितक महायुद्धाच्या दरम्यान मास्कचा वापर
  • १४ व्या दशकातही झाला होता मास्कचा उपयोग

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन(Lockdown) करण्यात आला आहे.  दरम्यान कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी मास्क हे सर्वोत्तम मार्ग  आहे.  एका संशोधनात अशी बाब समोर आली आहे की,योग्य स्थर असलेला मास्क हा ८४ टक्के विषाणूंच्या कणांना रोखतो. दरम्यान मास्क किती महत्त्वाचा आहे हे सांगणारे अनेक संशोधन समोर आले आहेत. पण मास्क अनेक शतकांपासून आपल्यामध्ये आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? विशेष म्हणजे या मास्कने मनुष्याचा प्रदूषण,विषारी वायू आणि महामारींच्या संक्रमणापासून बचाव केला आहे.(mask saved man for many years Read the history of the mask)

प्रदूषण,आजारपणापासून बचावासाठी मास्क आहे महत्त्वपुर्ण

मास्कचा उपयोग १४ व्या दशकात ब्लॅड डेथ प्लेगच्या काळात मास्कचा उपयोग खूप झाला होता. हा प्लेग युरोपमध्ये खूप पसरला होता. डॉक्टर विशिष्ट प्रकारचा मास्कचा वापर त्यादरम्यान करत. तर १८ व्या दशकात जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा मास्कने मनुष्याला विषारी गॅसपासून वाचवलं होतं. यासह प्रत्येक घरातील चुली मध्ये जळणाऱ्या कोसळ्यातून निघणाऱ्या काळ्या धूरापासून वाचवलं. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर युरोपच्या अनेक देशात १९ व्या दशकपर्यंत प्रदूषण वाढले होते. प्रदूषण वाढण्यामागे वाहतुकीसह अनेक गोष्टींना जबाबदार ठरविण्यात आले होते. पेट्रोल-डिझेलपासून चाणाऱ्या वाहनांतून निघणारे नायट्रोजन, ऑक्साइड,बारीक रबराचे कण, आणि धातूचे कणांमुळे लोकांचे आरोग्य खराब होत होते. यापासून वाचण्यासाठी लोक प्रदूषणविरोधी मास्क(Anti-pollution) चा वापर करू लागले.

जागतिक महायुद्धाच्या दरम्यानही मास्कचा वापर

जगातील पहिल्या आणि दुसऱ्या जागितक महायुद्धाच्या दरम्यान मास्कचा वापर खूप झाला होता. पहिले जागतिक महायुद्ध जेव्हा संपण्यात आलं होतं. तेव्हा १९१८मध्ये स्पेनिश फ्लू महामारी सुरू झाली होती.याच्यापासून वाचण्यासाठी डॉक्टर्स,नर्स आणि इतर आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मास्क परिधान करणे गरजेचे झाले होते. सामान्य नागरिकांनाही मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यावेळीही आताच्या कोविड-१९च्या सारखीच परिस्थिती झाली होती. मास्कचा वापर द्वितीय जागतिक महायुद्धाच्या दरम्यानही वाढला होता. जेव्हा रासायनिक शस्त्रांमुळे हवेत दम घुटू लागला होता. त्यावेळी अनेक देशांतील सरकारांनी आपल्या सैनिकांना आणि नागरिकांना विषारी वायुपासून वाचण्यासाठी मास्क वापरण्यास सांगितले होते.आज परत एकदा कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात मास्कचा वापर महत्त्वाचा असल्याचं सांगितले आहे,तर तज्ज्ञ लोक वारंवार मास्क लावण्यास सांगत आहेत. यासह सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करत आहेत.

काय म्हणते संशोधन

अमेरिकेच्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधील शास्त्रज्ञांसह तज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे सांगितले आहे की, मास्क तयार करण्यात वापरलेली सामग्री, त्याचा घट्टपणा आणि त्यात वापरल्या जाणार्‍या थर कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी