मुंबई : होळी हा रंगांचा सण जवळच आला आहे. सद्यस्थिती पाहता आपण सर्वांनी फक्त आपले जवळचे कौटुंबिक नातेवाईक व मित्रांसोबत जबाबदारीने व काळजीपूर्वक होळी सण साजरा करण्याच्या योजना केल्या असतील. मुंबईमध्ये कोविड-१९ केसेसच्या वाढत्या प्रमाणादरम्यान होळीचे रंग आपले मन, मूड्समध्ये नवचैतन्य आणतील आणि आपल्याला उत्साहित करतील. विषाणूपासून आपल्या स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, तसेच आपण आपली त्वचा व केसांचे अॅलर्जिक प्रतिक्रिया, पुरळ आणि केस कोरडे होण्यासोबत केसांचे झुलपे होणे यापासून संरक्षण करणे देखील आवश्यक आहे.
खालील लहान उपाय केस व त्वचेचे नुकसान होण्यापासून आणि कोणतीही चिंता न करता सणाचा आनंद घेण्यामध्ये मदत करू शकतात.
(मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या कन्सल्टण्ट डर्माटोलॉजिस्ट व कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट डॉ. स्मृती नस्वा सिंग यांचा लेख)