१०८ वर्षांच्या आजोबांवर यशस्वी शस्त्रक्रिया

तब्येत पाणी
Updated Oct 11, 2019 | 17:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

१०८ वर्षांचे गिरजादातगिरी गुरुदेवगिरी हे आधी कोणत्याही आधाराशिवाय नीट चालत होते पण एके दिवशी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली व जागेवरून उठता येणे कठीण झाले.

medical news successful surgery on 108 year old man news in marathi google batmya
१०८ वर्षांच्या आजोबांवर यशस्वी शस्त्रक्रिया 

थोडं पण कामाचं

  • कमरेच्या सांध्यांचे फ्रॅक्चर (हिप फ्रॅक्चर) झालेला भारतातील सर्वाधिक वयोवृद्ध रुग्ण
  • बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत
  • कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

मुंबई :  १०८ वर्षांचे गिरजादातगिरी गुरुदेवगिरी हे आधी कोणत्याही आधाराशिवाय नीट चालत होते पण एके दिवशी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली व जागेवरून उठता येणे कठीण झाले. जवळच्या एका डॉक्टरकडे एक्सरे काढला असता आढळून आले की त्यांच्या मांडीच्या हाडाचा वरचा भाग मोडला होता.

त्यानंतर त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे वय आणि अशक्त शरीर पाहता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे योग्य ठरेल का हे पाहण्यासाठी काही प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या निष्कर्षांनुसार त्यांच्या डाव्या बाजूला हिप हेमिआर्थ्रोप्लास्टी (पार्शियल हिप रिप्लेसमेंट) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. जनरल ऍनेस्थेशिया देऊन त्यांच्या ऑर्थोपेडिक सर्जन व कन्सल्टन्ट डॉ. अविनाश दाते व त्यांच्या टीमने तसेच ऍनेस्थेशिओलॉजी कन्सल्टन्ट डॉ. नवीन पजई यांनी शस्त्रक्रिया केली.

या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या टीमला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. रुग्ण अतिशय बारीक आणि त्यांची हाडे अतिशय अशक्त झालेली असल्यामुळे डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागली. प्रत्यारोपण केले जात असताना किती रक्त जात आहे याकडे डॉक्टरांचे बारकाईने लक्ष होते कारण याबाबतीत थोडी जरी चूक झाली असती तरी दुसरे एखादे फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता होती. शस्त्रक्रिया केली जात असताना रुग्णाच्या ईसीजीमध्ये खूप उतारचढाव होत होते, त्यामुळे शस्त्रक्रिया लवकरात लवकर संपविणे अत्यावश्यक होते. रुग्णाला हृदय व फुफ्फुसांचे आजार असल्यामुळे जनरल ऍनेस्थेशियावर खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागले. शस्त्रक्रियेनंतर एक दिवस रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवले गेले.

फिजिओथेरपीमध्ये रुग्णाने खूप चांगले सहकार्य दिले पण तरीही डॉक्टरांना फिजिओथेरपीदेखील अतिशय काळजीपूर्वक व सावकाश करावी लागली कारण रुग्णाचे हृदय आणि फुफ्फुसाचे आजार पाहता तब्येतीची गुंतागुंत वाढू न देणे महत्त्वाचे होते. त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलविण्यात आले पण फिजिओथेरपी सुरु ठेवली गेली. आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर फिजिओथेरपीमध्ये वाढ करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांनी त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यावेळी त्यांच्या सर्व जखमा पूर्णपणे भरलेल्या होत्या व ते वॉकरच्या साहाय्याने अतिशय आरामात चालत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...