प्रेग्नेंसी थांबविण्याची नवीन पद्धत: फक्त हाताला अन् खांद्याला लावा जेल नियंत्रणात येईल स्पर्म

पुरुषांसाठी गर्भ निरोधकांचा पर्याय म्हणजे कंडोम. आता कंडोम ऐवजी दुसरा पर्याय लवकरच येणार आहे.

men health a new form of male birth control just had a major breakthrough tlif
प्रेग्नेंसी थांबविण्याची नवीन पद्धत   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • बर्थ कंट्रोलसाठी पुरुषांकरिता जेल
  • ब्रिटेनच्या एडिनबर्ग विद्यापीठाकडून शोध
  • महिलांवरील गर्भ निरोधकाचा ताण होईल कमी

नवी दिल्ली:  पुरुषांसाठी गर्भ निरोधकांचा पर्याय म्हणजे कंडोम. आता कंडोम ऐवजी दुसरा पर्याय लवकरच येणार आहे. ब्रिटेनमधील शास्त्रज्ञ पुरुषांकरिता बर्थ कंट्रोलसाठी सर्वात सोपं आणि स्वस्त पद्धतीचा शोध लावत आहे. हा शोध ब्रिटेनच्या एडिनबर्ग विद्यापीठाकडून केला जात आहे. हे गर्भ निरोधक जेलच्या रुपात असेल. या जेलचे नाव NES/T  असून याला पुरुष कान्ट्रसेप्शन मधील एक महत्त्वपुर्ण शोध मानला जात आहे. या पुरुषाच्या बर्थ कंट्रोलच्या पद्धतीमुळे महिलांवरील गर्भ निरोधकाचा ताण कमी होईल.  (men health a new form of male birth control just had a major breakthrough tlif)

शंभरपेक्षा जास्त लोकांवर चाचणी 

या शोधात एडिनबर्ग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शंभरपेक्षा जास्त पुरुषांना NES/T जेलचा वापर करण्यास सांगितले. हे जेल सिंथेटिकच्या रुपात काम करते. जे प्रोजेस्टिन हार्मोनच्या माध्यमातून स्पर्मच्या स्थराला कमी करतं आणि टेस्टोस्टेरोनच्या माध्यमातून लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा वाढते. हे जेल पुरुषांना आपल्या दोन्ही हातांना आणि खांद्याला लावावे लागेल. ज्यानंतर त्वचा या जेलमध्ये असलेल्या हार्मोन्सला शोषून घेईल आणि पुरुषांमध्ये स्पर्म निर्मितीला कमी करेल. शोधात सहभागी असलेल्या पुरुषांनी दररोज आपल्या हातांच्या वरच्या भागाला आणि खांद्यांना लावले. ट्रायल दरम्यान डॉक्टरांनी या पुरुषांच्या शुक्राणुंच्या प्रमाणावर नजर ठेवली. टेस्टोस्टेरोन कमी असलेले पुरुष आपल्या मांडी आणि शरिरावर लावतात त्याचप्रमाणे हे NES/T जेल आहे. 

कंडोम आणि पिल्सऐवजी होईल जेलाचा वापर

दरम्यान ट्रायलनंतर आशा व्यक्त केली जात आहे की, पुरुष कंडोम किंवा मेल पिल्स घेण्याऐवजी जेलाचा वापर करतील. डॉक्टर बेबाक अशरफी यांनी द टेलीग्राफला सांगितलं, जेलाचा वापर केल्यानंतर पुरुष अधिक संतृष्ट झाल्याचे दिसतात. डॉ. बेबाक अशरफी पुढे म्हणाले की, काही पुरुषांना गर्भ निरोधकाची पद्धत थोडी कंटाळवाणी वाटते, कारण की, जेल सुकण्यासाठी थोडा वेळ लागतो. परंतु ही पुर्णपणे नवीन औषध आहे. याचा परिमाण कसा होता हे समजण्यास काही कालावधी लागेल.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी