Heart Attack : हार्ट अटॅक आणि रजोनिवृत्तीचे ही आहेत लक्षणे; महिलांनो लक्षणं ओळखण्यात करू नका चूक

तब्येत पाणी
Updated Mar 24, 2023 | 17:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Menopause Cause Heart Attack: स्त्रियांमध्ये हार्टअटॅकचे पेरिपार्टम कार्डिओमायोपॅथी हे एक गंभीर कारण असू शकते. मासिक धर्म संपण्याच्या वेळेमध्ये रजोनिवृत्तीच्या प्रभावांमुळे हृदयविकाराची समस्या उद्भवू शकते. महिलांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकते.

menopause cause heart attack symptoms
हार्टअटॅक आणि मेनोपॉजची लक्षणे ओळखण्यास महिलांनी करू नका चूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रजोनिवृत्तीनंतर महिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते
  • महिलांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकते.
  • हृदय विकार असलेल्या महिलांमध्ये ही लक्षणे दिसून येतात

Heart Attack And Menopause Symptoms: वाढत्या वयाबरोबर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. काहीवेळा उच्च रक्तदाब, धमनी रोग, वाल्व रोग आणि मधुमेह मेलिटस यांसारख्या विविध कारणांमुळे महिलांच्या हृदयावर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. (menopause cause heart attack symptoms)

रजोनिवृत्तीचे परिणाम आणि हृदयविकाराची लक्षणे यांच्यात फरक करण्यात चूक होता कामा नये. हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यात उशीर झाल्यास तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. महिलांची पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचण्याची शक्यता पुरुषांपेक्षा कमी असते. याचे कारण, लिंगामध्ये असलेली वैविध्यता असू शकते. स्त्रियांमध्ये साइलेंट हार्ट अटॅकची लक्षणे अधिक दिसण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा : ​Crime News: महाराष्ट्र हादरला! प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर प्रेयसीवर सामुहिक बलात्कार

शरीरातील एस्ट्रोजेन महिलांना हार्टअटॅक आणि हृदया संबंधित विकारापासून नैसर्गिक संरक्षण देते. एस्ट्रोजेन  HDL म्हणजेच चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. आणि ते LDL म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. पण रजोनिवृत्तीनंतर शरीरातील एस्ट्रोजेन हार्मोनची पातळी खूप जास्त प्रमाणात कमी होते. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, रजोनिवृत्तीनंतर एस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

TOI नुसार, मणिपाल हॉस्पिटल गुरुग्राममधील कार्डिओथोरॅसिक आणि व्हॅस्कुलर चिकित्सक प्रमुख डॉ. मनमोहन सिंग चौहान यांनी सांगितले की, महिलांमध्ये 40 वर्षांनंतर कधीही रजोनिवृत्तीचा काळ येऊ शकतो, मात्र, बहुतांश महिलांमध्ये रजोनिवृत्ती चे वय 50 इतके आहे. रजोनिवृत्तीनंतर महिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. शरीरातील एस्ट्रोजेनच्या पातळीत अचानक बदल झाल्यामुळे असे होऊ शकते. म्हणूनच हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

हृदय विकार असलेल्या महिलांमध्ये ही लक्षणे दिसून येतात

ज्या स्त्रियांना हृदयविकाराची समस्या आहे, त्यांना मान आणि पाठीच्यावरच्या भागात दुखणे, अपचन, चक्कर येणे, मळमळ आणि थकवा यासारखी लक्षणे दिसतात. महिला अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास उशीर होतो. हृदयविकाराचा झटका आणि रजोनिवृत्तीदरम्यान महिलांना जाणवणारी लक्षणे एकसारखीच असू शकतात. या दोन्ही स्थितीमध्ये हृदयाची धडधड, रात्री घाम येणे, थकवा, अस्वस्थता, घाबरल्यागत होणे आणि छातीत दुखणे यांसारखे परिणाम दिसून येतात. 

अधिक वाचा : ​Mumbai metro : मुंबईकरांसाठी खुशखबर, मेट्रोच्या तिकिटांवर सूट...

डॉक्टरांकडे केव्हा जावे?

ब्रिटिश हार्ट फाउंडेशन 40 वर्षाहून अधिक वयाच्या महिलांना त्यांच्या डॉक्टरांकडे नियमित चेकअप साठी जाण्याचा सल्ला देते. जेणे करून हृदयविकारसारख्या समस्यांचे निदान लवकर होऊन त्याच्यावर उपचार करणे शक्य होते. शिवाय, हार्टअटॅक सारखी परिस्थिति उद्भवण्याआधीच महिला सावध होऊ शकतात. साधारण थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, किंवा मान दुखणे ही हार्टअटॅकची पूर्वसूचना देणारी लक्षणे आहेत, आणि ही लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. 

अधिक वाचा  : वजन वाढण्यासाठी ऑफिसमधल्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत

हार्ट अटॅक आल्यानंतर उडणारा गोंधळ खूप घातक ठरू शकतो, कारण एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळेच महिलांना आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी वयाच्या 40  व्या वर्षी महिलांनी ट्रेडमिल टेस्ट (TMT), इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG), MRI आणि इको कार्डियोग्राम यांसारख्या चाचण्या करणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी