केवळ लहानांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठी अमृतासमान आहे दूध, जाणून घ्या याचे महत्त्व

तब्येत पाणी
Updated Jun 16, 2019 | 21:06 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जर तुम्ही विचार करत असाल की दूध पिणे केवळ लहान मुलांसाठीच गरजेचे आहे तर तुम्ही हा विचार बदला. हे तुमच्यासाठीही तितकेच गरजेचे आहे जितके नवजात मुलासाठी

milk drinking
दूध पिण्याचे महत्त्व  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: लहानपणी दूध पिण्याची सवय मुलांना असते मात्र आपण जसे मोठे होत जातो तशी ही सवय कमी कमी होत जाते.अनेकदा लोक दूध पिणे बंदच करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का दूध पिणे जसे लहानांसाठी फायदेशीर असते तितकेच ते मोठ्यांसाठीही फायदेशीर असते. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकत्वे असतात आणि जेव्हा आपण यात आणखी पोषकतत्वे मिसळतो तेव्हा याचे महत्त्व अधिक वाढते. १ जूनला जगभरात आंतरराष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो. याचे महत्त्व समजण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. 

ज्याप्रमाणे नवजात बाळासाठी दूध हे त्याचे जीवन आहे त्याचप्रमाणे मोठ्यांसाठीही दूध पिणे गरजेचे आहे. जर दुधातील लॅक्टोजमुळे तुम्हाला अॅलर्जी होते तर तुम्ही सोया अथवा नारळाचे दूध पिऊ शकता. स्वाद आणि आरोग्यासाठी या दोनही प्रकारचे दूध उत्तम आहे. जाणून घ्या दूध आणि या दुधात काही औषधीय तत्व मिसळल्याने होणारे फायदे...

  1. कॅल्शियमने परिपूर्ण दूध दात आणि हाडांना मजबूत करते. यासोबतच यातील प्रोटीन मांसपेशींना तसेच पेशींनाही मजबूत करते.
  2. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी दुधापेक्षा वेगळे कोणते औषध नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दुधामध्ये इसबगोल मिसळून प्यावे. 
  3. चांगल्या झोपेसाठी तसेच बुद्धिचा विकास होण्यासाठी कोलाईनची गरज असते. दुधामध्ये चांगल्या प्रमाणात कोलाईन असते. त्यामुळे हे पिणे गरजेचे असते. 
  4. दुधामध्ये व्हिटामिन डी नसते. मात्र यात जेव्हा सोया अथवा बदाम मिसळले जाते तेव्हा यात व्हिटामिन डीचे प्रमाण वाढते. व्हिटामिन डीमुळे कॅल्शियम हाडांमध्ये शोषले जाते. ऑस्टियोपोरोसिस, डिप्रेशन, मांसपेशींमध्ये तणाव, हायबीपी, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका व्हिटामिन डीमुळे कमी होतो. यासाठी दुधामधील पोषकतत्वे वाडण्यासाठी त्यात बदाम, सोया मिल्क पावडर, प्रोटीन पावडर मिसळले पाहिजे. 
  5. दुधामध्ये आले, लवंग, वेलची, केशर, हळद, दालचिनी मिसळून प्यायले पाहिजे. या मसााल्यांमुळे दूध पचण्यास मदत होते. तसेच वेट लॉस, मेमर शार्प करण्यासाठी, कमजोरी दूर करण्यासाठी मदत होते.

वजन कमी करण्यासाठी लस्सी उत्तम पर्याय

वजन कमी करायचे असेल तर लस्सी हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज् असतात. त्यामुळं शरीरात फॅट्स तयार होत नाहीत. इतर पदार्थांमध्ये असणारे फॅट्स अन्न नलिकेच्या आत अवरण तयार करतात. परंतु, लस्सी पिल्याने अन्न नलिकेवर कोणताही परिणाम होत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
केवळ लहानांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठी अमृतासमान आहे दूध, जाणून घ्या याचे महत्त्व Description: जर तुम्ही विचार करत असाल की दूध पिणे केवळ लहान मुलांसाठीच गरजेचे आहे तर तुम्ही हा विचार बदला. हे तुमच्यासाठीही तितकेच गरजेचे आहे जितके नवजात मुलासाठी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola