Hair tonic: चिरलेल्या कांद्यामध्ये ही खास गोष्ट मिसळून बनवा हेअर टॉनिक, केस गळणे थांबेल

Hair tonic:घरच्या घरी कांद्याच्या पाण्यात ही खास गोष्ट मिसळून तुम्ही तुमचे केस गळणे थांबवू शकता. हे टॉनिक केसांवर लावल्याने केस मजबूत आणि घट्ट होतात.

Mix this special thing in chopped onion and make a hair tonic
कांद्यापासून तयार करा हे हेअर टॉनिक...   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तांदूळ आणि कांदा वापरून बनवा हे टॉनिक..
  • या टॉनिकमुळे केस गळणे थांबतात
  • हे टॉनिक वापरल्यास केस मजबूत आणि घट्ट होतात.


Hair tonic:  कांद्याचा रस केसांसाठी जादूसारखा काम करतो हे तुम्हाला माहिती आहे. आता या रसात एखादी खास गोष्ट मिसळून केसांवर स्प्रे केल्यास केस गळण्याची समस्या पूर्णपणे दूर होईल. हा स्प्रे फक्त 10 मिनिटांत तयार होईल आणि तुम्ही पहिल्यांदा लावाल तेव्हा त्याचा परिणाम तुम्हालाही दिसून येईल..

onion rice homemade hair spray to stop hair fall


केसांसाठी टॉनिक बनवण्याकरता फक्त 3 गोष्टींची गरज असते

-3-


घरी ठेवलेल्या फक्त 3 गोष्टींच्या मदतीने तुम्ही हे हेअर टॉनिक तयार करू शकता.

1 कांदा

1 ग्लास पाणी

1/2 वाटी तांदूळ

सर्व प्रथम, कांदा बारीक चिरून घ्या आणि एका मोठ्या भांड्यात ठेवा, जेणेकरुन तो गॅसवर गरम करता येईल.

असं तयार करा केसांसाठी टॉनिक... 


आता कांद्याच्या भांड्यातच अर्धा वाटी तांदूळ टाका. त्यातच एक ग्लास पाणी घाला. त्यानंतर चमच्याने या गोष्टी ढवळून घ्या जेणेकरुन तांदूळ चिकटणार नाही. आता हे भांडे गॅसवर ठेवा आणि पाणी चांगले तापू द्या. पाणी गरम झाल्यावर गॅसची आच कमी करा आणि 5 ते 6 मिनिटे शिजू द्या. 
नंतर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या आणि ते गाळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा. 


हे टॉनिक कसे वापरावे


आता हे टॉनिक शॅम्पूच्या कमीतकमी 30 मिनिटे आधी केसांमध्ये लावा. कंगव्याच्या साहाय्याने केसांची विभागणी करा आणि फवारणी करत रहा. कांद्याचा रस असल्यामुळे या स्प्रेमधून तुम्हाला उग्र वास येऊ शकतो. पण एकदा शॅम्पू केला की हा वास पूर्णपणे निघून जाईल. तुम्ही पहिल्यांदाच हा स्प्रे वापराल तेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुमचे केस गळणं पूर्वीपेक्षा कमी झालं आहे..


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी