Monkeypox Virus Infection What is Monkeypox Virus Symptoms Treatment : कोरोना संकट नियंत्रणात येत असतानाच नव्या विषाणूचं संकट निर्माण झालं आहे. आता मंकीपॉक्स विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या विषाणूविषयी सध्या तरी मर्यादीत माहिती उपलब्ध आहे. यामुळेच मंकीपॉक्स विषाणूची बाधा झालेल्यांना बरे करण्यासाठी सध्या ठोस उपचार पद्धती उपलब्ध नाही. कोरोना संकटातून सावरत असलेल्या इंग्लंडमध्ये मंकीपॉक्स विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. हा विषाणू इतर देशांमध्ये पसरला तर नव्या महामारीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
नायजेरियातून इंग्लंडमध्ये आलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याचे आढळले. इंग्लंडच्या आरोग्य विभागाने देशात मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाल्याचे जाहीर केले. मंकीपॉक्स हा आजार उंदीर आणि माकडांच्या मार्फत माणसांमध्ये पसरण्याचा सर्वाधिक धोका आहे.
मंकीपॉक्स विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीला अंगदुखीचा प्रचंड त्रास होतो. सांधे दुखावणे, हाडे दुखणे, ताप येणे, पोटदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी अशा स्वरुपाचे त्रास होऊ लागतात. चिकनपॉक्स प्रतिबंधक लस मंकीपॉक्स विषाणूचा प्रभाव कमी करते. पण ही लस मंकीपॉक्स विरुद्ध मर्यादीत प्रमाणातच प्रभावी ठरत आहे. उपचार सुरू करण्यास झालेली दिरंगाई मंकीपॉक्सबाधीत व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.
ऑर्थोपॉक्स विषाणूच्या जीन्सचा मंकीपॉक्स विषाणूशी संबंध आहे. मंकीपॉक्स विषाणू म्हणजे व्हेरियोला, व्हॅक्सिनिया, काउपॉक्स या तीन विषाणूंशी संबंधित आजारांचे एकत्रित आणि धोकादायक स्वरुप असे म्हणता येईल. मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण अमेरिकेत १९५८ मध्ये आढळला होता. पण संसर्ग पसरण्याचा धोका कमी असल्यामुळे त्यावेळी अमेरिकेला मंकीपॉक्स संकट लवकर नियंत्रणात आणता आले होते.
मंकीपॉक्सबाधीत रक्ताचा वा मांसाचा प्रवेश शरीरात झाला तर आजार होण्याचा धोका सर्वाधिक आहे. यामुळेच पदार्थ खाणे, पदार्थ तयार करणे, पदार्थाची खरेदी-विक्री अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मांसाहारी पदार्थांच्या थेट संपर्कात येणाऱ्यांना मंकीपॉक्स होण्याचा धोका जास्त आहे.
इंग्लंडच्या आरोग्य विभागाच्यामते मंकीपॉक्स हा कोरोना प्रमाणे हवेतून पसरणारा आजार नाही. यामुळे मंकीपॉक्सच्या संसर्गाची तीव्रता कोरोनाच्या तुलनेत कमी आहे. पण वेळेत उपचार झाले नाही तर मंकीपॉक्स बाधीत रुग्णाचा जीव जाण्याचा धोका आहे.
मंकीपॉक्सची बाधा झालेल्यांच्या दृष्टीपटलावर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळेच मंकीपॉक्स बाधीत रुग्णावर वेळेत उपचार सुरू होणे आवश्यक आहे. पण मंकीपॉक्सच्या बाबतीत एक गंभीर समस्या आहे. या आजाराची बाधा झाल्यानंतर निरोगी व्यक्तीच्या शरीरात लक्षणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून दिसू लागतात. यामुळे अनेकजण उपचार सुरू करण्यास दिरंगाई करतात. पण लक्षणे दिसू लागताच लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले तर परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.
मंकीपॉक्सची बाधा झालेल्या व्यक्तीला ताप येणे, अंगदुखी अशा स्वरुपाचे त्रास आधी सुरू होतात. नंतर शरीरावर फोड येण्यास सुरुवात होते. माणूस विद्रूप दिसू लागतो. यामुळे माणूस मानसिकदृष्ट्या खचतो. यानंतर आजारा शरीरात वेगाने पसरतो. यामुळे बरे वाटत नसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे आहे.