Monsoon Soup Recipes: पावसाळ्यात खूप फायदेशीर ठरतात हे तीन सूप

सूप हा असा पदार्श आहे की प्रत्येत ऋतूत तो आरोग्यदायी असतो. मात्र पावसाळ्यात काही सूप इम्यूनिटी वाढवण्यासाठी मदत करतात. ऋतूप्रमाणे सूप पिणं गरजेचं आहे. तर जाणून घ्या पावसाळ्यात कोणतं सूप पिणं चागलं असतं. 

soups
Monsoon Soup Recipes: पावसाळ्यात खूप फायदेशीर ठरतात हे तीन सूप  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • पावसाळ्यात हे तीन सूप खूप फायदेशीर
  • या तिन्ही सूपमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
  • पावसाळ्यात इम्यूनिटी वाढवण्यासाठी हे सपू गरजेचे

हिवाळ्यात तुम्हांला असं सूप गरजेचं असतं की जो तुम्हांला तुमचं शरीर गरम ठेवेल आणि उन्ह्याळ्यात असं सूप प्याव ज्यामुळे तुमचं शरीर अंतर्गत थंड राहिल. तर पावसाळ्यात देखील तुम्हांला असे सूप घेणं गरजेचं आहे, ज्यामधून तुमची इम्यून सिस्टम मजबूत होईल. मान्सूनमध्ये आजारी पडण्याची लक्षणं जास्त असतात. त्यासाठी सूप पिणं गरजेचं असतं. 

सूपचं वैशिष्ट्य म्हणजे की, ते सहज बनतं आणि एक सूपच्या वाटीतून तुमच्या शरीराला बरीच पोषक तत्त्व सुद्धा मिळतात. पोटासाठी देखील सूप चांगलं असतं. भाज्या, मटण, फळं असं मिळून जेव्हा  सूप तयार केलं जातं तेव्हा ते खूप चविष्ठ होतं. पोट भरण्यासोबतच हे तुमच्या शरीराल अतिरिक्त कॅलेरीज घेण्यापासूनही रोखतं. स्वास्थ्य भोजनाच्या रूपानं सूपाची क्षमता अंतहीन आहे आणि केवळ हे चविष्ठ बनवण्यासाठी तुम्हांला थोडी क्रिएटिव्हीटी दाखवावी लागेल. 

सूपमध्ये असतं एन्टी ऑक्सिडेंट 

सूपची एक वाटी एन्टी ऑक्सिडेंट, फाईटोकेमिकल्सनी भरलेलं असतं. त्यासोबतच यात फायबर देखील असतं. सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या, फळं किंवा मटण, चिकन टाकून त्याला आणखीन चविष्ठ बनवू शकता. त्यासोबतच चव आणि पोषण वाढवण्यासाठी बर्‍याच फायदेशीर औषधी वनस्पतींचा देखील समाविष्ट करू शकता. तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणते तीन प्रकारचे सूप पिणं गरजेचं आहे, जे तुम्हांला अंतर्गत शक्तिशाली बनवतात आणि रोगांचा सामना करण्यासाठी तयार करतात. 

मूग डाळ- किवी आणि नारळ सूप रेसिपी 

ही खूप वेगळी रेसिपी आहे, जी नारळ, किवी आणि मूग डाळ यांना एकत्रित मिळून बनवली जाते. यात हेल्दी फॅट असतात जे रोग प्रतिकारक क्षमता वाढवते. मूग डाळीत प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. जर तुम्ही याची मोठी एक वाटी प्यायलात तर हे एक वेळचं  जेवण सिद्ध करू शकतो. तुम्हाला पाहिजे असल्यास सूप आणखीन चविष्ठ बनवण्यासाठी यात भाज्या मिसळू शकता. कीवीमध्ये व्हिटामीन सी असतात आणि तसंच या सूपमध्ये एक चव जोडण्याचं काम देखील करते. 

कॉर्न(मका) आणि फ्लॉवर सूप रेसिपी

फ्लॉवरमध्ये फायबर आणि व्हिटामीन सीचं मुख्य स्त्रोत आहे. हे इम्यून मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. जेव्हा फ्लॉवर कॉर्नसोबत मिळते तेव्हा याचे पोषक तत्त्व आणखीन वाढतात. फ्लॉवर आणि कॉर्न उकडून यात तुम्ही आवडते सॉस आणि भाज्या मिसळू शकता. हे सूप वजन कमी करण्यासाठी खूप मदत करते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Our top three comforting soups to lift your mood on a rainy day! Find the recipes at www.cafemyrrh.com/blog !

A post shared by Cafe Myrrh (@cafemyrrh) on

सी फूड म्हणजेच खेकड्यांचं सूप

सी फूड प्रेमींना खेकड्याचा रस्सा खूप आवडतो. ज्यात झिंगा, समुद्रातील मासा बासा आणि शिंपल्या यांचा समावेश असतो. झिंगा म्हणजेच खेकडा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतं. यात असलेले आयरन शरीराला एन्टी ऑक्सिडेंट देतं. सीफूड हे प्रोटीनचं स्त्रोत आहे. यात ओमेगा- ३ फॅटी अॅसिड देखील असतं. जे हृदय आणि रोगप्रतिकारक प्रणाली साठी खूप चांगलं असतं. 

तर मग आजपासून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सूपला नक्कीच जागा देण्यास सुरूवात करा. तुमच्या आवडीनुसार सूप बनवा आणि आरोग्यास बळकटी द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी