Morning Sore Throat: झोपेतून उठल्यावर घसा का खवखवतो? करा ‘हे’ घरगुती उपाय

सातत्याने गिळायला त्रास होणे, आवाजात खर जाणवणे, घसा दुखणे, घसा कोरडा पडणे असे त्रास जाणवत असतील, तर त्यामागे गंभीर कारणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कुठलंही नेमकं कारण स्पष्ट होत नसेल, तर डॉक्टरांना भेटून ते जाणून घेणं आवश्यक आहे.

Morning Sore Throat
झोपेतून उठल्यावर घसा का खवखवतो?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सकाळी उठल्यानंतर अनेकांचा होतो घसा खवखवण्याचा त्रास
  • घसा खवखवण्यामागे असू शकतात अनेक कारणं
  • नेमक्या कारणांचा शोध घेऊन उपाय करण्याची गरज

Morning Sore Throat: थंडीचा मौसम (Winter) सुरू झाला आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घसा खवखवायला (Sore Throat) सुरुवात होत असल्याचा अनुभव अनेकांना येऊ लागला आहे. नेहमीच्या सर्दी किंवा खोकल्याचंही हे कारण असू शकतं किंवा व्हायरल फिव्हरचं (Viral Fever) लक्षण असण्यााचीही शक्यता मानली जाते. मात्र याचं नेमकं कारण तुम्हाला समजत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. सातत्याने गिळायला त्रास होणे, आवाजात खर जाणवणे, घसा दुखणे, घसा कोरडा पडणे असे त्रास जाणवत असतील, तर त्यामागे गंभीर कारणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कुठलंही नेमकं कारण स्पष्ट होत नसेल, तर डॉक्टरांना भेटून ते जाणून घेणं आवश्यक आहे. पाहूया, सकाळी उठल्यावर घसा खवखवण्यामागे नेमकी कुठली कारणं असू शकतात. 

डिहायड्रेशन

आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर घाम जात असेल आणि आपल्याकडून पुरेसं पाणी पिलं जात नसेल, तर त्याचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे तुमचं तोंड कोरडं पडण्याची शक्यता असते. त्यामुळे घसा खवखवायला सुरुवात होते आणि गिळण्यास वेदना व्हायला सुरुवात होते. अनेकदा जास्त वेळा लघवी होण्यासाठीची औषधं घेतल्यामुळेही हा त्रास होण्याची शक्यता असते. 

घोरण्याची सवय

अनेकजण झोपेत थोड्याफार प्रमाणात घोरत असतो. जेव्हा तुमच्या गळ्यातील स्नायू स्थिर असतात, तेव्हा घोरण्याचा मोठा आवाज येतो. घशावाटे आता जाणारी आणि बाहेर येणारी हवा तिथल्या उत्तिकांवर आदळल्यामुळे हा आवाज निर्माण होत असतो. त्यामुळे सातत्याने घोरणाऱ्या व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर घशात खवखवत असल्याचा अनुभव येण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Sleeping Tips: टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वापरून पाहाच

धुम्रपान

स्मोकिंगमुळे घशाशी संबंधित अनेक विकारांना आमंत्रण मिळतं. कोरडा खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे अनेक त्रास त्यामुळे सुरू होण्याची शक्यता असते. 

व्हायरल इन्फेक्शन

घसा खवखवण्यामागे व्हायरस हेच कारण असू शकतं. सर्दी किंवा तापात असतात, तशाच विषाणूंचा प्रभाव घशावरही पडू शकतो.

स्ट्रीप थ्रोट

काही व्हायरस घसा खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. यात सर्वाधिक प्रभावी असतात ते स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स. त्यामुळे घशाला त्रास होतो. 

पित्ताचे ढेकर

अनेकदा अन्न न पचल्यामुळे ॲसिडीटी वाढते. अशा वेळी पित्ताचे ढेकर येतात. त्याचा परिणाम घशावर होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - स्किझोफ्रेनियावरील औषधाच्या संशोधनासाठी “डॉ. वैशाली लोंढे” यांना पेटंट

ट्यूमर

जर तुमचा घसा सातत्याने खवखवत असेल, तर तुम्हाला त्याची तातडीने तपासणी करून घेण्याची गरज असते. ट्यूमर हेदेखील याागचं एक कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

करा हे उपाय

  • घशाला आराम पडण्यासाठी आइस चिप्स किंवा पॉप्सिकल्स चघळा
  • जर तुमच्या बेडरुममधील हवा फारच कोरडी असेल, तर ह्युमीफायरचा उपयोग करा
  • मिठाच्या पाण्याने गुळण्या करा
  • गरम पदार्थ आणि मुबलक द्रव पदार्थ पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवा
  • मधाचा आहारात उपयोग करून घशाचं आरोग्य उत्तम ठेवा.

डिस्क्लेमर - घशाच्या आरोग्यासंबंधी या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी