MOUNI ROY प्रमाणे घ्या त्वचेची आणि केसांची काळजी, नैसर्गिक ग्लोसाठी ट्राय करा न्यु ट्रिक्स

तब्येत पाणी
Updated Mar 24, 2023 | 18:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Skincare and Haircare Tips: बदलते वातावरण, खराब जीवनशैली आणि आहार यामुळे केस आणि त्वचेची स्थिती खराब होत असेल, तर घरच्या घरी नैसर्गिक उपाय करणे खूप फायदेशीर ठरू शकते. बॉलिवूड स्टार अभिनेत्री मौनी रॉयच्या स्किनकेअर आणि हेअरकेअर टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात.

Mouni Roy Skincare and Haircare beauty secrets follow this Tips
मौनीच्या ब्युटी सिक्रेटची चर्चा  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • स्किनकेअर आणि हेअरकेअर टिप्स
  • मौनीच्या ब्युटी सिक्रेटची चर्चा
  • चमकदार त्वचेसाठी दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्या

Mouni Roy Skincare and Haircare Tips: बदलते वातावरण, खराब जीवनशैली आणि आहार यामुळे केस आणि त्वचेची स्थिती खराब होत असेल, तर घरच्या घरी नैसर्गिक उपाय करणे खूप फायदेशीर ठरू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही अनेकदा विचार करत असाल की केमिकल प्रोडक्ट्स आणि एवढ्या बीझी लाइफस्टाइलनंतरही सेलिब्रिटींची त्वचा आणि केस इतके सुंदर आणि चांगले कसे राहतात तर टीव्ही आणि बॉलिवूड स्टार अभिनेत्री मौनी रॉयच्या स्किनकेअर आणि हेअरकेअर टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात. (Mouni Roy Skincare and Haircare beauty secrets follow this Tips)

चमकदार केसांसाठी मौनी रॉय काय करते

मौनीच्या अभिनयासोबतच तिच्या ब्युटी सिक्रेटचीही खूप चर्चा असते. त्वचा आणि केसांची चांगली काळजी घेण्यासाठी मौनी कोणत्याही प्रकारचे फार महाग किंवा फॅन्सी केमिकल वापरत नाही. जीवनशैलीतील छोटे बदल, सकस आहार, चांगल्या सवयी हे तिच्या नैसर्गिक ग्लोमागील सर्वात मोठे रहस्य आहे. फॅशन दिवा मौनी फेस मास्क, हेअर सीरम, नाईट क्रीम इत्यादी बनवण्यासाठी सामान्य घरगुती वस्तू वापरते हे तुम्हाला माहित आहे का? चला तर आज आपण चमकदार त्वचा आणि चमकदार केसांसाठी मौनी रॉय काय करते हे जाणून घेवूया आणि तिच्या विशेष सौंदर्य टिप्स फॉलो करूया.

अधिक वाचा: Health Tips : दातांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत या पाच गोष्टी

ग्लोसाठी त्वचेचे हायड्रेशन खूप महत्वाचे

आपण जे खातो आणि जे पितो त्याचा आपल्या शरिरावर कसा परिणाम होतो हे समजून घ्यायला काही रॉकेट सायन्स लागत नाही. त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर विशेषतः त्वचेवर लगेच दिसून येतो. त्वचेच्या ग्लोसाठी त्वचेचे हायड्रेशन खूप महत्वाचे आहे, जर तुम्हाला देखील चमकदार त्वचा हवी असेल तर त्वचेचे हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी, तुम्ही नियमितपणे पाणी आणि इतर निरोगी द्रवपदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. मौनी रॉय देखील चमकदार त्वचेसाठी दिवसभरात सुमारे 8-10 ग्लास पाणी पिते.

फळांचे ज्युस

सौंदर्यासाठी मौनी फक्त पाणीच नाही तर जादुई पेय देखील पिते. जे रोज सकाळी प्यायल्याने त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते. स्वच्छ त्वचेसाठी मौनी दररोज सकाळी गरम पाण्यात दालचिनी पावडर टाकून पिते. यासोबतच त्वचेची नैसर्गिक आर्द्रता सुनिश्चित करण्यासाठी मौनीला केळी खायला आवडते. केळीमध्ये असलेले पोषक तत्व त्वचेसाठी खूप चांगले मानले जातात.

मेकअप

मौनी शक्य तितका कमी मेकअप करणे पसंत करते. जेणेकरून केमिकलयुक्त उत्पादने तिच्या त्वचेवर कमीतकमी लागू होतात आणि त्वचेची नैसर्गिक चमक दीर्घकाळ टिकून राहते. यासोबतच मौनीच्या मेकअप रुटीनमध्ये दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत, ज्यामुळे तिची त्वचा चांगली राहते. मेकअप करण्यापूर्वी मौनी नेहमी स्किन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते.

अधिक वाचा:  Summer Skin Care Tips in Marathi: उन्हाळ्यात त्वचेची ऍलर्जी आणि फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी घरगुती उपाय

एलो वेरा आणि हळद फेस पॅक

नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी मौनी तिच्या चेहऱ्यावर कोरफड आणि हळद फेस पॅक लावते. घरी बनवलेला हा नैसर्गिक फेस पॅक वापरल्याने त्वचा चमकू लागते आणि मुरुमांची समस्याही लगेच दूर होऊ शकते. एलोवेरासोबतच मौनी हळद आणि दुधापासून बनवलेला फेस पॅक देखील वापरते.

फेस मसाज

चेहऱ्याला स्वच्छ करणे आणि पोषण देणे खूप महत्वाचे आहे, तरच तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नैसर्गिक चमक येईल. मौनी आठवड्यातून एक किंवा दोनदा चेहरा स्वच्छ करते. ज्यासाठी ती नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून हलक्या हाताने फेस मसाज करते. चेहऱ्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण जलद होते आणि सर्व बंद छिद्रेही उघडतात.

अधिक वाचा:  Janhvi Kapoor: नैसर्गिक ग्लोसाठी जान्हवी कपूर फॉलो करते 'या' ब्युटी टिप्स

मौनी रॉय केसांची काळजी कशी घेते

  • तेल लावणे
  • माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनर
  • अंडी आणि दही हेअर मास्क
  • कांदा आणि तांदूळ पाणी
  • निरोगी पौष्टिक आहार

हे सर्व नियम फॉलो करून आणि योग्य आहार घेवून मौनी आपल्या केसांची आणि चेहऱ्याची काळजी घेते. तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात आपला स्किन केअर रूटीन सेट करा आणि आकर्षक ग्लो मिळवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी