Weight Loss Technic: वजन कमी करणं हे अनेकांसाठी आव्हान असतं. देशात सध्या ओव्हरवेट असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बदलती जीवनशैली आणि आहारातील फास्ट फूडचं वाढत प्रमाण यामुळे लठ्ठपणाची समस्या अनेकांना जाणवत आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी आहार हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. भारतीय आहारशास्त्रात असे काही पदार्थ आहेत, ज्यांचा योग्य वापर केला तर लठ्ठपणासह अनेक समस्या चुटकीसरशी दूर करता येऊ शकतात. अशीच एक कमालीची रेसिपी सध्या सर्व लठ्ठ व्यक्तींसाठी वरदान ठरते आहे. त्याच्या सेवनामुळे लठ्ठपणा कमी होतोच, शिवाय मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळवायलाही त्याचा फायदा होतो.
तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य
हे पाणी तयार होतं मेथीपासून. मेथीमध्ये फायबर, प्रोटिन, फॅट, लोह आणि मॅग्नेशिअम यासारखे अनेक घटक असतात. याशिवाय प्रचंड प्रमाणात अँटि ऑक्सिडंट्सही मेथीमध्ये असतात. त्यामुळे मेथी ही शरीरातील अनेक विकारांवरचा उपाय ठरते. मेथीचं योग्य प्रकारे सेवन केलं, तर अनेक विकारांना पळवून लावता येणं शक्य आहे. मेथीपासून हे पाणी कसं तयार करायचं आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात, हे समजून घेणं गरजेचं आहे.
मेथीचं पाणी प्यायल्यामुळे शरीराचं वजन कमी व्हायला मदत होते. मेथीचं पाणी पिल्यानंतर भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे वारंवार खाण्याचे प्रकारही कमी होतात आणि शरीरात कमी कॅलरीज घेतल्या जातात. मेथीमुळे पचनशक्तीही सुधारते आणि चयापचय क्रियेचा दर्जा वाढतो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास त्याचे सर्वोत्तम फायदे मिळतात.
जर लिव्हर उत्तम असेल, तर शरीरात कोलेस्ट्रॉल साठून राहण्याची प्रवृत्ती कमी होते. मेथीच्या पाण्यामुळे लिव्हरचं आरोग्य उत्तम राहतं. त्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता वाढते आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी आपोआपच नियंत्रणात राहायला सुरुवात होते. बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी झाल्यामुळे आरोग्य सुधारतं.
मेथीच्या पाण्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेथीच्या बियांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते. दररोज मेथीचं पाणी पिल्यामुळे वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं.
मेथीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित केलं जातं. मेथीचं पाणी पिण्याचा सल्ला नेहमीच डायबेटिक्स रुग्णांना दिला जातो.
आधिक वाचा - Weight Loss Tips : कढीपत्ता खा झटपट वजन कमी करा
पोटात जेव्हा गॅस होईल, तेव्हा एक कप मेथी पाण्यात भिजवून ते पाणी प्यावं. त्यामुळे गॅस निघून जातात आणि पोटाला आराम मिळतो.
आधिक वाचा - नाकातून रक्त येणे हे कोविडचे गंभीर लक्षण आहे का?
मेथीचं पाणी तयार कऱण्याची पद्धत अगदीच सोपी आहे. मेथी पाण्यात घालून ते पाणी उकळायचं. त्यानंतर गाळण्यानं गाळून एका भांड्यात घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल, तर त्यात थोडसं मधही तुम्ही घालू शकता.