Weight Loss TIps : या बियांमुळे एका महिन्यात होईल वजन कमी, पुन्हा पोहोचाल वयाच्या विशीत

वजन वाढत असल्याची चिंता अनेकांना सतावत असते. वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय जालीम ठरतात. त्यातीलच एक उपाय म्हणजे मेथी.

Weight Loss TIps
या बियांमुळे एका महिन्यात होईल वजन कमी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मेथीचं पाणी पिल्यामुळे वजन होतं कमी
  • पचनक्रिया सुधारून भूक लागण्यासाठी उपयुक्त
  • मासिक पाळीच्या अनेक समस्यांवरही ठरतो गुणकारी

Weight Loss Tips | आपलं वजन कमी करावं, असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी योगापासून डाएटपर्यंत अनेक उपायदेखील केले जातात. कघी एखाद्या आहारतज्ज्ञाकडे जाऊन खाण्यापिण्याचा सल्ला घेतला जातो, तर कधी जिममध्ये जाऊन तासन्‌तास घाम गाळला जातो. मात्र पुन्हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे यात खंड पडतो आणि वजन जिथं होतं तिथंच पोहोचतं. बदललेली जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा आणि वाढते ताणतणाव यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात आणि त्याचा परिणाम वजन वाढण्यावरही होतो. काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येते आणि वजन पटापट नियंत्रणात आणणं शक्य होतं. त्यासाठी सर्वोत्तम ठरतात मेथीच्या बिया. 

मेथीच्या बियांचे फायदे

मेथीच्या बिया जर पाण्यात भिजवून ठेवल्या आणि त्या पाण्याचं सेवन केलं, तर वजन कमी व्हायला सुरुवात होते. त्यासाठी एक चमचा मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यावर हे पाणी अगोदर उकळावं. त्यानंतर ते गाळून घ्यावं आणि पिऊन टाकावं. रोजच्या रोज हा उपाय केला तर एका महिन्यात वजन बऱ्यापैकी कमी होतं, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. 

अधिक वाचा - Weight Loss Tips : नाश्त्याची वेळ बदलून तुम्ही कमी करू शकता वजन आणि पोटाची चरबी, जाणून घ्या सर्वोत्तम वेळ

मासिक पाळीतील त्रासावर गुणकारी

मासिक पाळीत महिलांना होणाऱ्या अनेक त्रासांवर मेथी गुणकारी ठरते. मेथीच्या पाण्याचा काढा प्यायल्याने मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनाही कमी होतात. मासिक पाळीत असणारी अनियमितता दूर करण्यासाटीदेखील मेथीच्या पाण्याचा उपयोग करण्याची पद्धत आहे.

त्वचा होते चमकदार

मेथीच्या पाण्याचं नियमित सेवन केल्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि ती अधिक सतेज आणि तुकतुकीत होते. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात सी जीवनसत्व असतं. त्यामुळे चेहऱ्यावरील तेज वाढायलाही मदत होते. वारंवार पिंपल्स उठण्याची समस्या ज्यांना असते त्यांनाही मेथीचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यातील औषधी घटकांमुळे वारंवार चेहऱ्यावर फुटकुळ्या उठण्याचं प्रमाण कमी होतं. बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांसाठी तर मेथीचं पाणी हे एक वरदानच ठरतं. 

अधिक वाचा - Foods for Thyroid: अमेरिकन डॉक्टरांच्या मते ही औषधी वनस्पती थायरॉईडसाठी आहे रामबाण उपाय... लगेच घरी आणा

पचनशक्ती सुधारते

मेथीचं पाणी नियमित सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणं शरीरासाठी घातक ठरणाऱ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करायलाही याची मदत होते. जर साखरेचं प्रमाण वाढत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीदेखील मेथीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. या पाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अनेकांना भूक न लागण्याची समस्या सतावत असते. अशा व्यक्तींना मेथीच्या पाण्याचा फारच उपयोग होतो. मेथीच्या पाण्यामुळे पचनक्रिया सुधारल्यामुळे भूक लागण्यास सुुरुवात होते आणि त्याचा एकूण फिटनेसवर चांगला परिणाम होतो. 

अर्थात, या सर्व सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला गंभीर स्वरुपाच्या समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी