Health News: कोणत्या शहरात सर्वात जाड लोक आहेत? नावाचा झाला खुलासा, अनेक रोगांचा धोका

तब्येत पाणी
Updated Apr 02, 2022 | 12:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health Tips In Marathi | आपल्या सर्वांना कल्पना आहे की लठ्ठपणा अनेक घातक रोगांना आमंत्रण देऊ शकतो. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात हे सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे यातून असे उघड झाले की देशातील अर्ध्याहून अधिक लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे ५३ टक्के भारतीयांना हृदयविकाराचा धोका वाढला आहे.

Mumbai, Bangalore, Delhi and Chennai have the highest number of obese people
कोणत्या शहरात सर्वात जाड लोक आहेत? नावाचा झाला खुलासा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लठ्ठपणा अनेक घातक रोगांना आमंत्रण देऊ शकतो.
  • देशातील अर्ध्याहून अधिक लोकांना हृदयविकाराचा धोका आहे.
  • मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई येथे केलेल्या सर्वेक्षणात दिल्लीत सर्वाधिक लठ्ठ लोक आढळून आले आहेत.

Health Tips In Marathi | मुंबई : आपल्या सर्वांना कल्पना आहे की लठ्ठपणा अनेक घातक रोगांना आमंत्रण देऊ शकतो. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात हे सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे यातून असे उघड झाले की देशातील अर्ध्याहून अधिक लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे ५३ टक्के भारतीयांना हृदयविकाराचा धोका वाढला आहे. असेच काहीसे धोकादायक संकेत एका सर्वेक्षणाचे निकाल देत आहेत. (Mumbai, Bangalore, Delhi and Chennai have the highest number of obese people). 

अधिक वाचा : PMCच्या साडेआठ लाख खातेदारांना मिळाले बँकेत अडकलेले पैसे

सर्वेक्षणातील निकाल धक्कादायक 

मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई येथे केलेल्या सर्वेक्षणात दिल्लीत सर्वाधिक लठ्ठ लोक आढळून आले आहेत. हे सर्वेक्षण एकूण १४६१ लोकांवर करण्यात आले. या सर्वेक्षणात ७७ टक्के पुरूष आणि २३ टक्के महिलांचा समावेश होता. 

हाय BP चा धोका 

लठ्ठ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा धोका ४१ टक्क्यांनी जास्त असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. तसेच BMI जास्त असल्यास हाय बीपीचा (High BP) धोकाही वाढतो. दिल्लीत राहणाऱ्या २६ ते ४० वयोगटातील ४६ टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. त्याच सर्वेक्षणानुसार ५० टक्के लोकांचे वजन जास्त आहे आणि ३८ टक्के लोक इतके लठ्ठ आहेत की ते रोगाच्या कॅटेगरीत येतात. यासोबतच उच्च रक्तदाबाचे बळीही दिल्लीत सर्वाधिक आढळले आहेत. 

अधिक वाचा : ऐकाव ते नवलच! येथे ऑफिसमध्ये झोपल्यावर मिळतात हजारो रूपये

हार्ट अटॅकचा धोका 

२६ ते ४० वयोगटातील ४६ टक्के लोकांना हृदयविकाराचा (Heart Attack) धोका असतो. ४१ ते ६० वयोगटातील ३४ टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका असतो. BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स (Body Mass Index) जास्त असल्यास रक्तदाबाचा धोका जास्त असतो. असा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे की दिल्लीतील २३ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या असल्याने कॉर्परेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची जीवनशैली वाईट आहे. इंडिया हेल्थ लिंक आणि हील फाऊंडेशनचे सर्वेक्षण आज प्रसिध्द झाले. 

कसे मोजायचे BMI? 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) जर तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI) २४ पेक्षा जास्त असेल. तर तुम्ही लठ्ठ आहात. मात्र जर तुमचा बीएमआय ३० पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सर्जरी करावी लागेल. चला तर म आता कॅल्क्युलेटर घ्या आणि तुमचा लठ्ठपणा मोजा. उंची सेमी वजन किलोग्रॅममध्ये आणखी एक सोपा मार्ग म्हणजे महिलांच्या कंबरेचा घेरा ३५ इंच आणि पुरुषांचा ४० इंचापेक्षा जास्त असेल तर तो लठ्ठपणा मानला पाहिजे असे बोलले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी