Mushroom Benefits: हृदयापासून डायबिटीजपर्यंत अनेक मोठ्या आजारांवर मशरूम फायदेशीर, जाणून घ्या फायदे

Health Benefits Of Mushroom: देशात अनेक ठिकाणी मशरूमची लागवड केली जाते. औषधी गुणधर्मामुळे याला जास्त मागणी आहे. जाणून घेऊया मशरूमचे फायदे.

Mushroom
मशरूम आरोग्यासाठी खूप फायदेशीर 
थोडं पण कामाचं
  • मशरूम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • मशरूममध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.
  • मशरूम रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

मुंबई: Health Benefits Of Mushroom: बहुतेक लोकांना मशरूम आवडतात. केवळ चव नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे मशरूम. मशरूमपासून बनवलेल्या रेसिपीबद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण त्याचे फायदे फार कमी लोकांना माहिती आहेत.  मशरूममध्ये आरोग्य आणि औषधी गुणधर्म भरपूर असतात. मशरूममध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. मशरूमचं सेवन केल्यानं रोगांशी लढण्याची क्षमताही वाढते. यामध्ये कमी कॅलरीज असतात, जे वजन कमी करण्यासाठी देखील काम करतात. देशात अनेक ठिकाणी मशरूमची लागवड केली जाते. औषधी गुणधर्मामुळे याला जास्त मागणी आहे. जाणून घेऊया मशरूमचे फायदे.

मशरूम रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

मशरूम शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. तसंच मशरूम अनेक रोगांशी लढण्याची ताकद देतात. मशरूममध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स ते अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल बनवतात. मशरूम सूक्ष्मजीव आणि इतर बुरशीजन्य संक्रमण देखील बरे करते.

हृदयासाठी फायदेशीर असतं मशरूम

हृदयरोग असलेल्या रूग्णांसाठी ही मशरूम खूप फायदेशीर आहे. यामध्ये उच्च पोषक तत्वे आढळतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

पाचन तंत्र प्रणाली ही मजबूत करतं

मशरूमच्या सेवनाने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो, जसे की बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी. त्याचवेळी ते रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी देखील राखतं. कारण त्यात फॉलिक अॅसिड आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.

अॅनिमियाच्या रुग्णांनी मशरूमचे सेवन करावं

मशरूम शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते. अॅनिमियाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये फॉलिक अॅसिड आणि लोह भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.

अधिक वाचा- दिल्लीतील फोन कॉलमुळे फडणवीस नाराज? नेमकं काय घडलं राजभवनातील शपथविधी दरम्यान? वाचा INSIDE STORY

त्वचेसाठी फायदेशीर

आरोग्यासोबतच मशरूम त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मशरूममुळे त्वचा चमकदार होते. मशरूममध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेवर मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत होते. 

(अस्वीकरण: या लेखात सुचविलेल्या टिपा आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी