Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलंय तर या 3 गोष्टी जरुर खा!

शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास अनेक जीवघेणे आजार उद्भवतात अशावेळी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही पदार्थांचे सेवन केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

must eat fish curd and green tea when cholesterol increases risk will not increase health news
Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलंय तर या 3 गोष्टी जरुर खा! 
थोडं पण कामाचं
  • शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तीन पदार्थांचं आवर्जून करा सेवन
  • कोलेस्टेरॉल वाढू नये यासाठी ग्रीन टीचं करा सेवन
  • वाढत्या कोलेस्टेरॉलकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Cholesterol: जेव्हा आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं (Cholesterol) प्रमाण प्रचंड वाढतं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वाढत असल्याचं जाणवतं. मग तो पक्षाघात असो वा हृदयविकाराचा झटका. अशा वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांचा धोका देखील वाढतो. वास्तविक, जेव्हा तुमच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते तेव्हा अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. 

आपली बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अशा समस्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करणारे असे अन्न पदार्थ खावेत. ज्यामुळे आपल्या आरोग्यात नक्कीच सुधारणा होऊ शकते. 

१. मासे खाणे आवश्यक आहे

 माशांमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप चांगले असते. अशा परिस्थितीत आठवड्यातून एकदा हे खाणे आवश्यक आहे, यामुळे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. म्हणजेच ते खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे मासे खाणं गरजेचं आहे. मात्र, मासे शिजवताना फार तेलाचा वापर करु नये. 

अधिक वाचा: या बियांमुळे एका महिन्यात होईल वजन कमी

२. ग्रीन टी पिणे आवश्यक आहे

ग्रीन टी प्यायल्याने तुमचे वजन तर कमी होतेच पण हे पेय तुम्हाला अनेक आजारांपासूनही सुरक्षित ठेवते. यामुळेच हे पेय कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण ग्रीन टी पिणं उपयुक्त समजत आहेत. ज्याचा त्यांना फायदाही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

३. दह्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते

खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दही देखील हा एक अत्यंत चांगला असा खाद्य पदार्थ आहे. दिवसाच्या दुपारच्या जेवणात दह्याचा अवश्य समावेश करा. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियमही चांगल्या प्रमाणात मिळते. म्हणजेच यामुळे तुमच्या शरीरातील हाडेही मजबूत होतील. मात्र, रात्रीच्या जेवण्यात दह्याचा शक्यतो वापर करु नये. 

हे तीनही पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फारच गुणकारी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र यासोबत योग्य ते वैद्यकीय उपचार देखील घेणं आवश्यक आहे.

(टिप: वरील माहिती ही घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्याचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी