Myths about weight loss: उपाशी राहिल्यामुळे खरंच वजन कमी होतं? वाचा, वैज्ञानिक सत्य

खाण्यामुळे वजन वाढते तसे उपाशी राहण्यामुळे ते कमी होते, असा अनेकांचा समज असतो. त्यात काही अंशी तथ्य असलं तरी तसं करण्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे.

Myths about weight loss
उपाशी राहिल्यामुळे खरंच वजन कमी होतं?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वजन कमी करण्यासाठी अनेकजण राहतात उपाशी
  • उपाशी राहण्याने शरीरावर होतात दुष्परिणाम
  • नाश्ता कधीच न चुकवण्याचा सल्ला

Myths about weight loss: वजन कमी करणं (Weight Loss) हा अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचं ध्येय झालेलं असतं. गेल्या काही वर्षात बदललेली जीवनशैली (Lifestyle), वाढते ताणतणाव (Stress), कामाच्या चुकीच्या वेळा (work timing) आणि अपुरी झोप यामुळे वजन वाढू लागल्याची समस्या अनेकांना सतावत असते. अशा व्यक्ती वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते उपाय करत असल्याचं दिसतं. काहीजण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पद्धतशीरपणे वजन घटवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र काहीजण ऐकीव गोष्टींच्या आधारे काहीही प्रयोग करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यातीलच एक बाब म्हणजे उपाशी राहणे (Hungry). खाण्यामुळे वजन वाढते तसे उपाशी राहण्यामुळे ते कमी होते, असा अनेकांचा समज असतो. त्यात काही अंशी तथ्य असलं तरी तसं करण्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी असे अघोरी प्रकार न करण्याचा सल्ला दिला जातो.

उपाशीपोटी झोपू नका

वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण बंद करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात काही अंशी तथ्य असलं तरी रिकाम्या पोटी झोपण्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. रात्रीच्या वेळी हलका आहार घेण्याची गरज असते. मात्र याचा अर्थ अजिबातच अन्न न खाता झोपी जाणं हे चुकीचं असल्याचं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्याऐवजी कोमट दूध, अंडे, ओट्स यासारख्या हलक्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 

उपाशी राहू नका

काहीजण रात्रीप्रमाणेच दिवसभरही उपाशी राहण्याचा किंवा कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम व्हायला सुरुवात होते. उपाशी राहण्याने शरीराला ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे आपली शारीरिक क्षमता कमी होण्यास सुरुवात होते. उपाशी राहण्यामुळे पचनासंबंधी विकार जडायलाही सुरुवात होते आणि रात्रीच्या झोपेवरही त्याचा परिणाम होतो. उपाशी राहिल्यामुळे मेंदूला होणारा पोषक घटकांचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे अशा व्यक्ती वारंवार चिडचिड्या झाल्याचं दिसतं. उपाशी राहण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींची पचनशक्ती ही मंदावलेली असते. त्यामुळे पुन्हा नेहमीप्रमाणे खायला सुरुवात केल्यानंतर शरीरात फॅट्स साठू लागतात आणि वजन कमी होण्याऐवजी ते वाढायलाच सुरुवात होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Skin damaging food: हे चार पदार्थ त्वचेसाठी ठरतात ‘विष’, आजपासून करा बंद

नाश्ता टाळू नका

सकाळचा पहिला नाश्ता टाळण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत थोडा फायदा होत असला तरी शरीराचं नुकसान होत असतं. सकाळच्या नाश्त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि अशा व्यक्ती सहसा आजारी पडत नाहीत. त्यामुळे सकाळचा नाश्ता बंद करण्याऐवजी फळं, पालेभाज्या, सूप असा हलका नाश्ता करणं आवश्यक आहे. 

अधिक वाचा - Side effects of coconut water: नारळ पाण्याचाही काहीजणांना होऊ शकतो त्रास, ही असतात कारणं

पाण्याशी करा मैत्री

जेव्हा जेव्हा भूक लागल्यासारखं वाटेल, तेव्हा तेव्हा भरपूर पाणी पिणं हादेखील वजन कमी करण्याचा उत्तम उपाय असतो. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यांचं प्रमाण तुम्ही काहीसं कमी केलंत आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढवलंत, तर वेटलॉसचा प्रवास लवकर सुकर होण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर - वजन कमी करण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी