Nail bitting: तुम्हाला नखे खाण्याची सवय आहे का? या टिप्सने मिळवा सुटका

तब्येत पाणी
Updated Oct 26, 2021 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्हालाही नखे खाण्याची सवय असेल तर या टिप्सनी तुम्ही या सवयीपासून सुटका मिळवू शकता. 

nail bitting
तुम्हाला नखे खाण्याची सवय आहे का? या टिप्सने मिळवा सुटका 
थोडं पण कामाचं
  • नखे खाणे शरीरासाठी हानिकारकच असते.
  • नखांची खाण तोंडाच्या माध्यमातून पोटात जाते आणि अनेक प्रकारचे आजार होतात.
  • जेव्हा नखे खाण्याची अधिक सवय कमी करायची असते तेव्हा डॉक्टर यासाठी अनेक उपाय सुचवतात.

मुंबई: नखे खाण्याची सवय(nail bite) ही काही लहान मुलांनाच नसते तर मोठ्यांनाही याची सवय असते. अनेकदा काही कामासाठी एकाग्रता बनवताना तर कधी तणावामुळे(stress) तर कधीतणाव कमी करण्यासाठी काहीजण नखे खातात. कारण काहीही असले तरी नखे खाणे(nail bite) हे कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी हानिकारकच असते. सतत नखे खाल्ल्याने नखांच्या बाजूच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. यामुळे नखे असामान्य दिसू लागतात. nail bite is dangereous for health

नखे खाणे शरीरासाठी हानिकारकच असते. कारण नखांची खाण तोंडाच्या माध्यमातून पोटात जाते आणि अनेक प्रकारचे आजार होतात. जेव्हा नखे खाण्याची अधिक सवय कमी करायची असते तेव्हा डॉक्टर यासाठी अनेक उपाय सुचवतात. असेच काहीसे सोपे उपाय आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. जाणून घ्या हे उपाय

नखे वाढवू देऊ नका

नखे खाण्याची सवय असेल तर नखे वाढवू नका. जर तुमची नखे लहान असली तर ती चावण्याचा प्रश्नच येत नाही. तुमची नखे लहान असली तर ती चावण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे ही सवय तुमची सुटेल. 

मेनिक्युअर करा

मेनिक्युअरमध्ये नखे सुंदर बनवली जातात. जर तुमची नखे दिसण्यास सुंदर असली तर ती तुम्ही खाणार नाही. वारंवार मेनीक्युअर केल्याने तुम्ही तुमची सुंदर नखे खाणार नाहीत. यामुळे ही सवय सुटून जाईल. 

नखांना वाईट चवीची नेलपेंट लावा

नखे खाण्याची सवय सुटत नसेल तर नखांना वाईट चवीची नेलपेंट लावा. नखे खाताना ही नेलपेंट चवीला खराब लागली तर नखे तरी खाल्ली जाणार नाहीत. नखांना तुम्ही कडुनिबांच्या कडवट तेलाचा वापर करू शकता. 

नखांना झाकून ठेवा

नखे झाकण्यासाठी तुम्ही नेल अॅक्सेसरीजचा वापर करू शकता. अथवा तुम्ही तुमची नखे टेप अथवा बँडेडने कव्हर करा. असे केल्याने तुम्ही तुमची नखे चावणार नाहीत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी