डेंग्यूपासून बचावासाठी ५ खास टिप्स!

तब्येत पाणी
Updated May 16, 2019 | 16:02 IST | टाइम्स नाऊ हिंदी

डेंग्यूचा ताप DENV व्हायरसमुळे होतो. डासांमुळे डेंग्यू पसरतो. हा व्हायरस उष्ण आणि समशीतोष्ण भागातील डांसामध्ये आढळू शकतो. आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस आहे. त्यानिमित्त जाणून घ्या डेंग्यूपासून बचावासाठी पाच टिप्स..

National Dengue Day
डेंग्यूपासून बचाव करण्याच्या ५ टिप्स  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: दरवर्षी १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. डेंग्यूचा ताप डासांमुळे पसरतो. एडीज डासानं चावल्यास डेंग्यूचा व्हायरस पसरतो. पावसाळात डेंग्यू अधिकच घातक होऊन जातो. डेंग्यू बद्दलची माहिती नसल्यामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येनं लोक डेंग्यूनं आजारी होतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रायलानं १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. डेंग्यू बाबत नागरिकांना जागरुक करण्यासाठी सरकार हा दिवस साजरा करत आहे.

डेंग्यू झाल्यास साधारणपणे व्यक्तीला खूप ताप आणि डोकेदुखीचा त्रास होतो. अनेकदा लोकं आपल्याला ताप आल्यास तो सामान्य समजून त्यावर उपचार घेत नाहीत. मात्र, ३-४ दिवसांत डेंग्यूचा व्हायरस अधिक धोकादायक होतो. डेंग्यू रुग्णांमधील आजार अधिक वाढवतो. त्यामुळे आतडे आणि हृदयाला नुकसान पोहोचू शकतं.

जाणून घ्या डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी ५ टिप्स

१. साचलेलं पाणी बदलावं

आता उन्हाळा सुरू आहे प्रत्येकाकडे कूलर सुरू असतो. मात्र कुलर, बादली आणि इतर भांड्यांमधील साचलेलं पाणी आठवड्यातून एकदा बदलावं. डेंग्यूचे डास साचलेल्या चांगल्या पाण्यामध्येही वाढतात. जर आपल्या घरात असं साचलेलं पाणी असेल तर डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी पाणी बदलण्यासोबत, पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवणं आवश्यक आहे. पाण्याचं भांडं खुलं ठेवू नये.

२. आपले हात-पाय झाकून ठेवावेत

डेंग्यूच्या प्रसरणाचा सर्वात मोठा ऋतू म्हणजे पावसाळा. सर्वांनी असेच कपडे घालावेत ज्यानं आपले हात-पाय झाकले जातील आणि डासांना चावण्यासाठी जागा मिळणार नाही. तसंच डासांपासून बचाव करण्यासाठीचं क्रीमही आपल्या त्वचेवर लावणं उत्तम.

३. रात्री मच्छरदाणीचा वापर करावा

रात्रीच्या वेळी डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. घरात डासांना पळवणाऱ्या स्प्रेचा सुद्धा वापर आपण करू शकतो. मात्र, ज्यांना असा स्प्रे वापरल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांनी मच्छरदाणीचा वापर करणं जास्त चांगलं आहे.

४. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा

घरात नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा. मात्र, पावसाळ्यात हे करणं अगदी आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात डेंग्यू पासून रक्षण करण्यासाठी डासांची ओल्या कचऱ्यामध्ये होणारी वाढ आपल्याला रोखता येईल. महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडील कचरा पेटी ही झाकलेलीच असावी.

५. रुग्णांना सुरक्षित आणि मोकळं ठेवावं

डेंग्यूपासून बचाव करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं डेंग्यू झालेल्या रुग्णाची काळजी घेणं होय. जर घरात डेंग्यूचा रुग्ण असेल तर त्याला चावलेला डास इतर कुणालाही चावू शकतो आणि त्यामुळं डेंग्यू पसरू शकतो, म्हणून रुग्णाची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
डेंग्यूपासून बचावासाठी ५ खास टिप्स! Description: डेंग्यूचा ताप DENV व्हायरसमुळे होतो. डासांमुळे डेंग्यू पसरतो. हा व्हायरस उष्ण आणि समशीतोष्ण भागातील डांसामध्ये आढळू शकतो. आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस आहे. त्यानिमित्त जाणून घ्या डेंग्यूपासून बचावासाठी पाच टिप्स..
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola