Drinks For Belly Fat : वजन कमी करणारी 'नॅचरल ड्रिंक्स'

natural drinks for belly fat consume green tea banana drink lemon drink and cinnamon drinks you can reduce belly fat even without gym : व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसेल तर 'नॅचरल ड्रिंक्स' पिऊन वजन कमी करू शकता.

natural drinks for belly fat consume green tea
Drinks For Belly Fat : वजन कमी करणारी 'नॅचरल ड्रिंक्स'  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Drinks For Belly Fat : वजन कमी करणारी 'नॅचरल ड्रिंक्स'
  • व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसेल तर 'नॅचरल ड्रिंक्स' पिऊन वजन कमी करू शकता
  • पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी 'नॅचरल ड्रिंक्स' हा उत्तम पर्याय

natural drinks for belly fat consume green tea banana drink lemon drink and cinnamon drinks you can reduce belly fat even without gym : दीर्घ काळ एका ठिकाणी बसून करायचे काम, फास्टफूड आणि जंकफूड यामुळे जगभर लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या झाली आहे. हे वाढते वजन कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे 'नॅचरल ड्रिंक्स'. आपल्याला व्यापांमुळे व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसेल तर 'नॅचरल ड्रिंक्स' पिऊन वजन कमी करू शकता. 

वजन कमी करणे सोपे आहे. पण वजन वाढल्यानंतर पोटावर निर्माण झालेली अतिरिक्त चरबी कमी करणे कठीण आहे. ही पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी 'नॅचरल ड्रिंक्स' हा उत्तम पर्याय आहे. 

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

  1. ग्रीन टी : पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी 'ग्रीन टी' हे उत्तम 'नॅचरल ड्रिंक' आहे. सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी 'ग्रीन टी' प्या. यामुळे पचनक्षमता वाढेल. 
  2. दालचिनी ड्रिंक : 'दालचिनी ड्रिंक' आणि मध यांचे सेवन केले तर वजन कमी होण्यास मदत होईल. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा दालचिनी पूड आणि एक चमचा मध एक ग्लास गरम पाण्यात मिसळा. ढवळून व्यवस्थित एकत्र करा आणि प्या.
  3. बनाना ड्रिंक : दररोज सकाळी एक ग्लास 'बनाना ड्रिंक' प्यायल्यास पटकन पोट भरेल. दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल.
  4. लेमन ड्रिंक : एक ग्लास पाणी तापवून घ्या. या तापवलेल्या (गरम) पाण्यात अर्धे किंवा अख्खे लिंबू पिळा. हे 'लेमन ड्रिंक' प्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 'लेमन ड्रिंक' प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी