Remove Upper Lips Hair: ओठांच्या वरील भागात येणाऱ्या केसांमुळे लाजू नका; घरबसल्या करा हे घरगुती उपाय

तब्येत पाणी
Updated Apr 15, 2022 | 18:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Remove Upper Lips Hair | ओठांच्या वरील भागात केस येणे ही महिलांसाठी सामान्य समस्या आहे. वरच्या ओठावर केस येण्यामागे हार्मोनल किंवा अनुवांशिक कारणे असू शकतात. यासाठी महिवा वारंवार पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार करून घेतात.

natural Home Remedies for Remove upper lips hair
ओठांच्या वरील भागातील केस घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ओठांच्या वरील भागात केस येणे ही महिलांसाठी सामान्य समस्या असते.
  • ओठांचे केस नैसर्गिकरित्या काढण्यासाठी दही, बेसन आणि हळद हे तिन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
  • अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात जे त्वचेचा रंग सुधारण्यासाठी मदत करतात. 

Remove Upper Lips Hair | मुंबई : ओठांच्या वरील भागात केस येणे ही महिलांसाठी सामान्य समस्या आहे. वरच्या ओठावर केस येण्यामागे हार्मोनल किंवा अनुवांशिक कारणे असू शकतात. यासाठी महिवा वारंवार पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार करून घेतात. लक्षणीय बाब म्हणजे तुम्हालाही पार्लरमध्ये जाण्याचा त्रास टाळायचा असेल, तर काही घरगुती उपायांनी तुम्हाला घरबसल्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळू शकते. तुम्ही देखील घरबसल्या ओठांवरील नको असलेले केस दूर करू शकता. अनेक महिलांच्या ओठांवर फारच कमी केस असतात तर काही महिला या समस्येमुळे खूपच त्रस्त असतात. (natural Home Remedies for Remove upper lips hair). 

अधिक वाचा : गुलाबराव पाटील यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

दही, बेसन आणि हळदीचा पॅक 

ओठांचे केस नैसर्गिकरित्या काढायचे असतील तर दही, बेसन आणि हळद हे तिन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हे तुमच्या त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यासोबतच त्वचेला एकदम स्वच्छ करते. वरच्या ओठांवरील केस काढण्यासाठी तुम्ही याचा वापर घरी सहजपणे करू शकता.

अंड्याच्या पांढऱ्या भागाने वरच्या ओठांवरील केस घालवा 

तुम्ही फक्त एका अंड्याचा पांढरा वापर करून तुमच्या वरच्या ओठावरील केस काढू शकता. खर तर अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात जे त्वचेचा रंग सुधारण्यासाठी मदत करतात. 

मध आणि लिंबाचा लेप 

वरच्या ओठांचे केस काढण्यासाठी अनेक घरगुती उपायांपैकी एक म्हणजे मध आणि लिंबाच्या सालीचा लेप तयार करणे आणि केसांना मेण लावणे. लक्षणीय बाब म्हणजे लिंबूमध्ये ब्लीचिंग गुणधर्म आढळतात. तर मधात चिकटपणा असतो. या दोन्हीचा लेप तयार करून तुम्ही ओठांच्या वरचे केस सहजरित्या काढू शकता. ही पद्धत कमी वेळात चांगला परिणाम देणारी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी