How to get rid of Cough: हिवाळा संपून आता उन्हाळ्याच्या दिवसाला सुरूवात होत आहे. हवामानातील हा बदल थेट रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करत असतो. त्यामुळेच सर्दी, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, ताप, टॉन्सिल्स, स्नायू दुखणे, छातीत आणि घशात कफ येणे, हवामानात बदल होताच नाक बंद पडणे अशा समस्यांना अनेकजण बळी पडतात आणि आजारी पडतात. अशात हवामान बदलामुळे खोकल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जर तुम्हाला औषध आणि कफ सिरप घेऊनही बरं वाटत नसेल, तर खाली दिलेले घरगूती उपाय करून पाहा. (Natural Remedies for Cough: These 10 things for cough are more effective, cough will be cured immediately)
दरम्यान, या उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त लोकांना खोकल्याचा त्रास होतो. खोकला जरी कोणता गंभीर आजार नसला तरी त्याने तुमच्या सामान्य कामकाजावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशावेळी परिस्थीती निर्माण होऊ शकते. खोकल्यासाठी अनेक औषधं आणि सिरप उपलब्ध आहेत, पण औषधांचा जास्त वापर केल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. खोकल्यापासून लवकर आराम मिळण्यासाठी घरगूती उपाय गुणकारी ठरू शकतात.
खोकला लागल्यावर घसा खवखवणे सहाजिक आहे. खोकला आणि घशाची खवखव कमी करण्यासाठी मध उपयुक्त ठरेल. मध हे एक औषध आहे जे खोकल्याच्या औषधांपेक्षा अधिक प्रभावी आहे. खोकला जर लवकर बरा करायचा असेल, तर मधाला आल्याच्या रसात मिसळून खावू शकता. त्याचबरोबर मधाला गरम पाण्यासोबत घेऊ शकता.
अधिक वाचा : बदलत्या हवामानात केस गळतात? मग करू नका या गोष्टी
अननस हे असं फळ आहे, जे खोकल्यावर गुणकारी ठरू शकतं. यात ब्रोमेलेन हा घटक असतो. एनसीबीआयच्या अहवालानुसार, अननसमध्ये आढळणारे ब्रोमेलेन हे एन्झाइम आहे जे खोकला दाबण्यास मदत करू शकते. खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी अननसाचा एक तुकडा खा किंवा दिवसांतून तीन वेळा अननसाचा ताजा रस प्या.
अधिक वाचा : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी
पुदिना फक्त चवीसाठीच नाही तर, औषधीय गुणांमुळे ओळखला जातो. पुदिन्याची हिरवी पाने सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी करण्याचे काम करतात. खोकल्यासाठी पुदिना खूप फायदेशीर असून याचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकता. तुम्ही पुदिन्याची चाय पिवू शकता, तसेच पुदिन्याची पाने गरम पाण्यात उकळून त्याचा रस पिवू शकता.
ओव्याच्या पानांत फ्लेव्होनॉइड्स नावाचा एक घटक असतो, जो खोकला कमी करण्यास तसेच गळ्याच्या मांसपेशींना आराम देतो आणि सूज कमी करतो. यासाठी तुम्ही घरीच उपाय करू शकता. त्यासाठी आवळ्याची पाने गरम पाण्यात उकळवून त्याची चहा पिवू शकता.
अधिक वाचा : हे 7 पेय वाढवतील हिमोग्लोबिन
अद्रक हे औषधी गुणधर्माचा खजिना आहे. तुम्ही खोकल्याशिवाय मळमळ, पोटासंबंधी समस्या, अपचन यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी आहे. यामुळे कफ पडून खोकल्यापासून लगेच आराम मिळतो. तसेच तुम्ही आल्याचा चहाही पिवू शकता. त्यामुळे घशातील खवखव आणि कोरडेपणा कमी होतो.
अधिक वाचा : या घरगुती उपायांमुळे Kidney Stone चं होईल पाणी
खोकल्यासह अनेक आजारांसाठी हळदीचा वापर पारंपारिकपणे केला जातो. हळदीमध्ये शक्तिशाली दाहकविरोधी गुणधर्म आहेत. खोकला आणि त्याच्या लक्षणांना कमी करण्यासाठी हळदीचा चहा किंवा गरम दूध पिवू शकता. त्याचा प्रभाव आणि चव वाढवण्यासाठी त्यात मिरची आणि थोडेसे मध टाकू शकता.