Kidney Stones : मेणासारखा वितळून जाईल तुमचा मूतखडा, बस करा हे 5 घरगुती उपाय!

तब्येत पाणी
Updated Mar 27, 2023 | 17:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Home remedies to remove kidney stones:चुकीच्या खाण्याच्या आणि पाणी कमी पिण्याच्या सवयीमुळे किडनी स्टोन (मूतखडा) ची समस्या उद्भवते. किडनी स्टोनचा त्रास असह्य होणाऱ्या वेदना आणि प्रचंड दाह देणारा असतो. अशावेळी काही घरगुती उपयांनी आपण किडनी स्टोन लघुशंकेमार्फत बाहेर काढू शकतो. जाणून घेऊयात- 

तुमची किडनी जितकी निरोगी असेल तितके तुम्ही तंदुरुस्त आणि व्याधीमुक्त राहाल.
किडनी मानवीय शरीरातील सगळ्यात महत्वाच्या भागांपैकी एक आहे.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काही घरगुती उपयांनी आपण किडनी स्टोन शरीराबाहेर काढता येतो
  • किडनी जर निरोगी असेल तर शरीर देखील तंदुरुस्त असते.
  • शास्त्रक्रियेची गरज पडणार नाही.

How to Fight Kidney Stones at Home किडनी मानवीय शरीरातील सगळ्यात महत्वाच्या भागांपैकी एक आहे. मूत्रपिंड आपल्या शरीरातील हानिकारक व विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे आणि इतर द्रव, रासायनिक व खनिज घटकांची पातळी राखण्याचे काम करत असते. तर किडनी शरीरातील संपूर्ण रक्त शुद्ध करण्याचे काम करत असते. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी माणसाची किडनी व्यवस्थित कार्य करणे आवश्यक आहे. आपण वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे सेवन करतो, ज्यांचे पुढे उर्जेमध्ये रूपांतर होते. (Natural Remedies to Fight Kidney Stones at Home)

यादरम्यान शरीरात अनेक प्रकारचे विषारी घटक जमा होतात. असे विषारी आणि शरीरासाठी घातक असलेले पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच मूत्रपिंडाची शक्य तितकी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची किडनी जितकी निरोगी असेल तितके तुम्ही तंदुरुस्त आणि व्याधीमुक्त राहाल.

अधिक वाचा : ​नवाजुद्दीनने भाऊ आणि पत्नीविरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला

पाण्याच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन होतो. या स्टोन चा आकारमान वटाण्याएवढ्या आकाराचा किंवा गोल्फ बॉलसारखा मोठा असू शकतो. कॅल्शियम ऑक्सलेट आणि इतर घटकांच्या संयुगांपासून मूत्रपिंडत विशिष्ट खडा तयार होतो, त्याची रचना स्पटीकासारखी असते, मूतखडा झाल्यामुळे वजन घटणे, ताप येणे, उल्टी येणे, लघवीतून रक्त पडणे आणि ओटी पोटात प्रचंड दुखणे, अशा समस्या लघवी करताना उद्भवतात. अशावेळी काही प्रभावी आणि नैसर्गिक उपायांच्या सहाय्याने मूतखडा काढून टाकता येऊ शकतो. . 

पाणी हे मानवी आरोग्यासाठी अमृत आहे. शरीरात हायड्रेशनची पातळी संतुलित राखण्याचे काम पाणी करते. पचन आणि अवशोषण प्रक्रिया जलद करण्याचे कार्यदेखील पाणी करते. पाण्यामुळे शरीरारतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. करण हे विषारी पदार्थ शरीरात राहिल्यास किडनीला नुकसान होऊ शकते. त्यामुळे किडनी स्टोन चा त्रास असलेल्या लोकांना दिवसातून 7-8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून लघवीमार्फत खडे निघून जाऊ शकतात.

अधिक वाचा :​कोणत्या राशींवर महादेवाची असेल कृपा; जाणून घ्या राशीभविष्य

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल

हार्वर्ड हेल्थनुसार, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण किडनी स्टोनवर प्रभावी उपचार ठरू शक्तात. हे ऐकण्यास जरी विचित्र वाटत असले तरी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. ज्या लोकांना मुतखडा सहज काढायचा आहे, त्यांनी मुतखडा निघून जाईपर्यंत हे मिश्रण रोज प्यावे. लिंबाचा रस मूत्रपिंडातील दगड तोडण्यास मदत करतो आणि हे कार्य घडत असताना ऑलिव्ह ऑइल विशिष्ट वंगण तयार करते, ज्यामुळे कोणत्याही वेदनाशिवाय स्टोन शरीरातून सहजपणे बाहेर पडू शकतो. 

ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये सायट्रीक एसिड असते, जे मुतखड्याचे लहान कणांमध्ये विघटन करून त्यांना पाण्यात विरघळण्यास सहाय्य करते. ऍपल सायडर व्हिनेगर मूत्रमार्गातून स्टोन बाहेर काढण्यास मदत करते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि किडनी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर करा. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मूत्रपिंड जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत दररोज दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळून प्या. 

अधिक वाचा : ​रिलेशनशीप राहूनही पोरं गर्लफ्रेंडशी का करत नाही लग्न?

डाळिंबाचा रस

नॅशनल किडनी फाऊंडेशनच्या मते, डाळिंब हे पोषकतत्वांनी परिपूर्ण असे सर्वोत्तम नैसर्गिक पेय आहे. डाळिंबाचा रस शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.  तज्ञांच्या मते, डाळिंबाचा रस किडनी स्टोन काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यामध्ये चांगले अँटिऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

कॉर्न सिल्कचे फायदे Corn Silk Benefits for kidney stone​     

मक्यावर जे बारीक केसांसारखे धागे आढळतात ते सहसा आपण फेकून देत असतो. मात्र हे धागे मुतखडयासाठी एक प्रभावी औषध आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? हे धागे पाण्यात उकळून गाळून प्यायल्यामुळे मूतखडा गळून पडण्यास मदत होते.  तसेच नवीन स्टोन तयार होण्यास ते प्रतिबंध करतात. शिवाय, लघवीचे प्रमाण वाढविण्यासाठी देखील हे चांगले औषध आहे. या धाग्यांच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे लघवीचा प्रवाह वाढतो, किडनी स्टोनच्या वेदना देखील कमी होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी