Beautiful Eyelashes : पापण्या लांब आणि घनदाट करण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय, वाढेल डोळ्यांचं सौंदर्य

आपल्या पापण्या लांबसडक आणि घनदाट असाव्यात, असं प्रत्येकीला वाटत असतं. काही सोप्या आणि घरगुती उपायांनी हे शक्य होतं.

Beautiful Eyelashes
पापण्या लांब आणि घनदाट करण्यासाठी घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पापण्यांच्या वाढीसाठी काही घरगुती उपाय
  • ग्रीन टी मुळे पापण्या होतात लांबसडक
  • नारळाच्या तेलामुळे होतो फायदा

Beautiful Eyelashes : ज्या व्यक्तीचे डोळे सुंदर (Beautiful Eyes) असतात, त्याकडे सगळेच आकर्षित होतात. आपले डोळे सुंदर असावेत आणि पापण्या लांब (Eye lashes) असाव्यात, असं अनेक मुलींचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक मुली प्रयत्नही करत असतात. ज्यांच्या पापण्या लांबसडक असतात, त्यांचा हेवा अनेकांना वाटत असतो. आपल्या पापण्या तशाच लांबसडक आणि सुंदर राहाव्यात यासाठी त्या प्रयत्नही करत असतात. काहीजणींच्या पापण्या मात्र तितक्याशा लांब नसतात. त्या तशा दिसाव्यात आणि आपल्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी अनेक तरुणी प्रयत्न करत असतात. त्यासाठी काही केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करून पापण्या लांब करण्याचे प्रयत्न काहीजणी करताना दिसतात. गेल्या काही वर्षात कृत्रिम आयलॅशेस लावण्याचं फॅड वाढत असून त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. थोडक्यात, कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या पापण्यांचं सौंदर्य वाढावं आणि त्यामुळे आपण सुंदर दिसावं, असं प्रत्येकीला वाटत असतं. मात्र त्यासाठी केमिकलयुक्त औषधं वापऱण्यापेक्षा किंवा आयलॅशेस लावण्यापेक्षा नैसर्गिकरित्या लांबसडक आणि घनदाट वाढलेल्या पापण्या अधिक आरोग्यपूर्ण ठरतात. त्या तशा करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय सुचवले जातात. जाणून घेऊया, असेच काही सोपे उपाय. 

ग्रीन टी

‘स्टाईलक्रेज’च्या रिपोर्टनुसार ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिफेनॉल असतं. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या पापण्या लांब आणि घनदाट होण्यास मदत मिळते. चांगल्या परिणामासाठी रोजच्या रोज ग्रीन टी पित राहणं आवश्यक आहे. त्याशिवाय रोज रात्री झोपताना ग्रीन टी थंड करून बोटांनी तो पापण्यांना लावल्यामुळेही फायदा होतो. 

अधिक वाचा - Tomato Fever : वेगाने पसरतोय टोमॅटो फिव्हर, ‘या’ लोकांना जास्त धोका

पेट्रोलियम जेली

पापण्यांना पेट्रोलियम जेली किंवा व्हॅलसीन लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुमच्या पापण्या लांब आणि घनदाट होण्यास मदत होईल. यामुळे पापण्यांच्या वाढीचा वेगही वाढत असल्याचा अनुभव अनेकींना येतो. 

ऑलिव्ह ऑईल

ऑईव्ह ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणावर फेनोलिक हा घटक असतो. यामुळे पापण्यांची वाढ वेगाने होऊ लागते. रोजच्या रोज ऑलिव्ह ऑईल हलक्या हाताने पापण्यांना लावावं. त्यामुळे पापण्यांचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

अधिक वाचा - Weight Loss Tips in Marathi : वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे पाळा खाण्याच्या वेळा, झटपट होईल वजन कमी

व्हिटॅमिन ई

बाजारात सहजासहजी उपलब्ध असणारी व्हिटॅमिन ई ची गोळी पापण्यांच्या आरोग्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे पापण्या गळण्याची आणि विरळ होण्याची समस्या दूर व्हायला मदत होते. 

अधिक वाचा - Digestion Tips : स्वादिष्ट आहे म्हणून जास्त खाल्ले...आता बिघडले पोट, मग या 5 किचन टिप्सने सांभाळा पचनक्रिया

नारळाचं तेल

केसांच्या चांगल्या वाढीसाठी नारळाचं तेल उत्तम आणि गुणकारी मानलं जातं. नारळाच्या तेलामुळे केसांमधील प्रोटिनचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होत असते. 

डिस्क्लेमर - पापण्यांच्या वाढीसाठी सुचवले जाणारे हे सामान्य आणि घरगुती स्वरुपाचे उपाय आहेत. यासंबंधी तुम्हाला काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी