Remedies to postpone periods: मासिक पाळी (Monthly periods) पुढे ढकलण्यासाठी (Postpone) आवश्यक असणारी अनेक औषधं (Medicines) सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या औषधांच्या मदतीने महिला काही दिवसांपासून ते काही आठवड्यांपर्यंत मासिक पाळी पुढे ढकलू शकतात. मात्र या औषधांच्या वापरामुळे अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स होत असतात ज्यांचा भविष्यात त्रास होण्याची शक्यता असते. अर्थात, डॉक्टरांच्या सल्ल्याने अशी औषधं घेणाऱ्या महिलांना तुलनेनं त्रास कमी होऊ शकतो. मात्र आपल्या मनाने वाटेल तेव्हा वाटेल तशा गोळ्या घेतल्याचा परिणाम मात्र भोगावा लागू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं हे आरोग्यासाठी हानीकारक ठरण्याची शक्यता असते.
केमिकलयुक्त औषधं न वापरता काही नैसर्गिक उपायांनीदेखील मासिक पाळी पुढं ढकलणं शक्य असल्याचं आतापर्यंतच्या वेगवेगळ्या संशोधनातून दिसून आलं आहे. शिवाय या उपायांनी कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. जाणून घेऊया नैसर्गिकरित्या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठीचे काही उपाय.
जर तुम्हाला पिरियड्स पुढे ढकलण्याची इच्छा असेल, तर याचं सेवन तुम्ही करू शकता. एक चमचा ॲपल साइडर विनेगर घेऊन ते गरम पाण्यात मिसळा. तुमच्या मासिक पाळीच्या 10 ते 12 दिवस अगोदर दररोज याचं सेवन करायला सुरुवात करा. याच्या सेवनामुळे ब्लोटिंगची समस्या कमी होते. पोटात दुखण्याचं प्रमाणही कमी होतं. शिवाय मासिक पाळीची तारीख काहीशी पुढे ढकलण्यातही यश येतं.
एक चमचा मोहरी रात्रीच्या वेळी पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवा. पिरियड्स येण्याअगोदर एक आठवडा यांचं सेवन करायला सुरुवात करा. यामुळे तुमचे पिरियड्स लेट होऊ शकतात. मोहरीत अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या तुमचे पिरियड्स लेट होतात.
ॲपल विनेगरप्रमाणेच लिंबाच्या रसाचाही उपयोग मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी होऊ शकतो. लिंबाचा रस गरम पाण्यात मिसळून घेण्यास सुरुवात करावी. मासिक पाळीच्या तारखेच्या एक आठवडा अगोदर याचे सेवन सुरु करावे. लिंबाच्या रसामुळे मासिक पाळीदरम्यान जाणवणारे अनेक त्रास कमी होण्यास मदत होते. वेदना कमी होऊन रक्तप्रवाह सुरळीत होण्यास त्यामुळे मदत होते.
अधिक वाचा - Oral health tips: रोज ब्रश करताना किती टूथपेस्ट वापरावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
पिडियड्सची तारीख पुढे ढकलण्यासाठी जिलेटिन हादेखील एक उत्तम मार्ग आहे. जिलेटिनचं एक पाकिट पाण्यात मिक्स करा. जर अगदी आयत्या वेळी तुमची धावपळ झाली, तर हा उपाय फायद्याचा ठरू शकतो. जिलेटिनमुळे तुमचे पिरियड्स साधारणपणे 4 तासांनी तुम्ही पुढे ढकलू शकता.
मुलताना माती हादेखील मासिक पाळी लांबवण्यासाठीचा चांगला पर्याय आहे. 25 ते 30 ग्रॅम मुलतानी माती घेऊन ती गरम पाण्यात मिसळा. पिरियड्सच्या तारखेअगोदर साधारण एक आठवडा त्याचं सेवन सुरू करा. कुठल्याही साईड इफेक्टशिवाय तुमचे पीरियड्स लेट होतील.
काकडी हा थंड प्रकृती असणारा पदार्थ आहे. त्यामुळे तुमच्या मासिक पाळीची तारीख पुढे ढकलता येणं शक्य होईल.