Neetu Kapoor Diet : 63 व्या वर्षीही स्वतःला ठेवलंय Ultra Fit, या डाएटने तर तुम्हीही व्हाल चिरतरूण

अभिनेत्री नीतू कपूर यांच्याकडे पाहिल्यावर वयाचा अंदाजच येत नाही. साठीतही त्यांनी तारुण्यातील फिटनेस आणि उत्साह कायम राखला आहे.

Neetu Kapoor Finess and Diet
नीतू कपूर यांच्या फिटनेसचं रहस्य  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • 63 व्या वर्षीही कमालीचा फिटनेस
  • वयानुसार व्यायामात बदल केले
  • आहारात कमीत कमी साखर आणि तेल

Neetu Kapoor Diet | अभिनेता रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) आई आणि अभिनेत्री अलिया भट्टची (Aliya Bhatt) सासू नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा फिटनेसच्या (Fitness) बाबतीत कुणीच हात धरू शकत नाही. लेक सिद्धिमासह अनेकदा व्यायाम आणि योगा करताना दिसणाऱ्या नीतू कपूर या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल भलत्याच जागरूक आहेत. स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्या आहाराबाबतच्या अनेक टिप्स देत असतात, ज्यावरून त्यांच्या डाएटची कल्पना येते. लहानपणापासूनच सकस अन्न खाण्याची सवय आणि खाण्यावर असणारं नियंत्रण यामुळे साठीतही त्या अगदी तंदुरुस्त आहेत. तारुण्यात होता तेवढा उत्साह आणि फिटनेस आजही त्यांनी राखला आहे. 

नीतू कपूर यांचा डाएट प्लॅन

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेकदा नीतू कपूर यांनी त्यांच्या ब्रेकफास्टचे फोटो शेअर केले आहेत. नीतू कपूर यांच्या नाश्त्यात बऱ्याचदा पोहे असतात. पोहे पचायला हलके असतात आणि नाश्ता म्हणून परफेक्ट. जर ओट्सचे पोहे वापरले तर त्यांचं पोषणमूल्य कित्येक पटींनी वाढतं. आपल्याला सर्वाधिक रोल्ड ओट्स पोेहे आवडतात, असं नीतू अनेकांना सांगत असतात. 

अधिक वाचा - पैसे परत मिळवण्यासाठी शेजाऱ्याच्या गेटवर केला बॉम्बस्फोट

भरपूर फळं खा

त्या त्या ऋतूत येणारी फळं ही नेहमीच आरोग्यासाठी पोषक असतात. फळांमुळे नाश्त्याचा शेवट गोड होतो आणि फिटनेससाठी त्याची मदत होते. कमीत कमी साखरेचं सेवन करणं, हा फिट राहण्यासाठीचा उत्तम उपाय आहे, असं नीतू म्हणतात. 

चौरस भोजन

नीतू कपूर यांना गच्च भरलेलं, अनेक पदार्थांनी सजलेलं ताट आवडतं. वरण, भात, चपाती, भाजी, चिकन असा चौरस आहार त्या घेतात. दोन जेवणाच्या मध्ये त्या बदाम खातात. बदामाप्रमाणं इतरही ड्रायफूट्स खाणं गरजेचं असून प्रत्येकानं आपापल्या आवडीचा सुकामेवा खावा, असं त्यांना वाटतं. ड्रायफूट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे सारखी सारखी भूक लागत नाही आणि अन्नाचं पचन होण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळतो. ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे त्यांना नाश्त्यात ड्रायफ्रूट्सचं प्रमाण वाढवण्याचा सल्ला नीतू कपूर देतात. 

अधिक वाचा - दिवसाला किती कप कॉफी पिणं चांगलं? जाणून घ्या

कमीत कमी तेलाचा वापर, हे नीतू कपूर यांच्या डाएटचं आणखी एक वैशिष्ट्यं. त्यांच्यासाठी तयार होणारे सगळे पदार्थ हे कमीत कमी तेलाचा वापर करून तयार करण्यात येतात. 

भरपूर व्यायाम

वयानुसार व्यायामाचे प्रकार बदलत असतात. नीतू कपूर स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगाचा अधिकाधिक उपयोग करतात. लेक रिद्धिमासोबत अनुलोम विलोम, सूर्य नमस्कार आणि योगासनं करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी