Signs of heart attack: ‘हार्ट अटॅक’चे थैमान का थांबत नाही? तुमचं हृदय सुरक्षित आहे ना? अशी करा खात्री

हार्ट अटॅक येतो तरी कशामुळे? इतक्या लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू का होत आहे? आणि आपलं हृदय तरी सुरक्षित आहे का? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

Signs of heart attack
तुमचं हृदय सुरक्षित आहे ना?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणं
  • लक्षणांवर ठेवा लक्ष
  • लाईफस्टाईल सुधारली तरी टळेल धोका

Signs of heart attack: गेल्या काही महिन्यांमध्ये देशात हार्ट (Heart Attack) अटॅक येऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आपल्या ओळखीतील मित्र किंवा नातेवाईक असोत किंवा मोठमोठे सेलेब्रिटी असोत, यातील अनेकजण हार्ट अटॅक आल्यामुळे मृत्यूमुखी पडल्याचं गेल्या काही आठवड्यात दिसून आलं आहे. कुणी स्टेजवर परफॉर्मन्स करत असताना, कुणी मैदानात खेळत असताना तर कुणी बसल्या बसल्या हार्ट अटॅकमुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे हा हार्ट अटॅक येतो तरी कशामुळे? इतक्या लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू का होत आहे? आणि आपलं हृदय तरी सुरक्षित आहे का? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. 

का वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण

डॉक्टरांनी नोंदवलेल्या निरिक्षणानुसार कमी वयातच हार्ट अटॅक येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षात वर्षात वाढत असल्याचं दिसून आलं आहे. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अपुरी झोप ही त्यामागील प्रमुख कारणं असल्याचं दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे स्मोकिंग, अल्कोहोल आणि व्यायामाचा अभाव यासारख्या कारणांनीदेखील हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. बॉडी बनवण्यासाठी अनेक तरुण आपल्या आहारात सप्लिमेंटचा वापर करतात. हा प्रकारही हार्टसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करणं किंवा प्रमाणाबाहेर डान्स करणं हे प्रकारदेखील हृदयासाठी घातक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - Identify pure milk: अशी ओळखायची भेसळयुक्त दुधाची ‘सफेदी’, टाळा फसवणूक!

हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणं

हार्ट अटॅक अचानक येतो, असं म्हटलं जातं. हार्ट अटॅकने मरण पावलेल्या माणसाला त्याची जाणीवच झाली नसावी, असं सर्वांना वाटत असतं. मात्र आपण आपल्या शरीराकडे लक्ष ठेवलं, तर ते आपल्याला हार्ट अटॅकची पूर्वसूचना देत असतं. हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणं समजून घेऊया. 

  • छातीत अचानक प्रचंड वेदना होणे
  • छातीतील दुखणं जबड्यापर्यंत पोहोचणे
  • छातीत भरल्यासारखं, जड वाटणे
  • हृदयाचे ठोके अचानक वाढणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • अचानक प्रचंड घाम येणे
  • थकवा येणे, गळून गेल्यासारखे वाटणे

वेळीच करा तपासणी

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्ट अटॅकचा धोका कुठल्याही वयात संभवण्याची शक्यता असते. त्यासाठी नियमित आपल्या हृदयाचं आरोग्य तपासण्याची गरज असते. त्याचप्राणं जर तुम्ही जिम जॉईन करायचा विचार करत असाल, तर कार्डिओलॉजिस्टकडून तुमच्या हार्टची तपासणी करून घेणं आवश्यक असतं. खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे, पुरेशी झोप घेणे, जंक फूड टाळणे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट योग्य प्रकारे करण्याची गरज असते. 

अधिक वाचा - Dengue Corona Difference: डेंग्यू आणि कोरोनाच्या लक्षणांत असतो फरक, गोंधळ टाळण्यासाठी ‘हे’ वाचा

डिस्क्लेमर - हार्ट अटॅकच्या लक्षणांबाबतची ही काही सामान्य निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी