बेली फॅट कमी करायचे आहे तर या ५ चुका करू नका

तब्येत पाणी
Updated Nov 26, 2020 | 14:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

बेली फॅट एक अशी समस्या आहे जी लोकांसमोर अनेक समस्या उभी करून ठेवते. यासाठी तुम्ही दररोजच्या काही चुका टाळायला हव्यात. या चुकांमुळे तुमचे बेली फॅट कमी होण्याऐवजी वाढते. 

belly fat
बेली फॅट कमी करायचे आहे तर या ५ चुका करू नका 

थोडं पण कामाचं

  • डाएटिंगसोबत व्यायाम करूनही तुमचे पोट काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे का?
  • आपल्या डाएटमध्ये नेहमी हिरव्या भाज्या आणि प्रोटीनचा समावेश करा.
  • मोठ्या प्रमाणात बीअरचे सेवन तुमच्या पोटाची चरबी वाढवण्याचे काम करते

मुंबई: योगा(yoga) आणि व्यायामाच्या(exercise) या जगात दोन प्रकारच्या लोकांची गर्दी पाहायला मिळते. एक ज्यांना वजन कमी(weight loss) करायचे आहे तर दुसरे ज्यांना वजन वाढवायचे(weight gain) आहे. मात्र या दोन प्रकारच्या लोकांमध्ये तिसरा गट असा असतो जे बारीकही नसतात आणि जाडही मात्र त्यांना समस्या सतावत असते ती म्हणजे बेली फॅटची. वाढलेले पोट हे मनासारखे कपडे घालू देत नाही. प्रत्येकवेळेस हे पोट लवपण्याचा प्रयत्न करावा लागतो तसेच वाढलेल्या पोटामुळे बऱ्याच ठिकाणी लाजल्यासारखे होते. 

तुम्हाला जर कोणी विचारले यावर उपाय काय तर तुमचे उत्तर असेल कडक डाएटिंग आणि भरपूर व्यायाम. जर आम्ही तुम्हाला विचारले की तुम्हाला याचा फायदा झाला का तर तुमचे उत्तर कदाचित नाही असेच असेल. याचा अर्थ डाएटिंगसोबत व्यायाम करूनही तुमचे पोट काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. अशातच तुम्ही जर दररोज त्याच चुका करत असाल तर तुमचे पोट कमी होण्याऐवजी वाढेल. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या चुका ज्या तुम्ही सतत करत आहात आणि त्यामुळेच बेली फॅट कमी होत नाही आहे. 

आपल्या डेली रूटीनमध्ये चुकीच्या आहाराचा समावेश

आपल्या डेली रूटीनमध्ये तुम्ही काय खाता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. अनेकदा आपण कळत नकळत अशा खाद्यपदार्थांचे सेवन करतो ज्यामुळे आपले बेली फॅट वाढते.आपल्या डाएटमध्ये नेहमी हिरव्या भाज्या आणि प्रोटीनचा समावेश करा. यासोबतच तुम्ही मासे, नट्स आणि अॅवोकॅडोचा देखील समावेश करू शकता. याशिवाय मटण तसेच तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा. 

स्मोकिंग

तुमचे बेली फॅट कमी न होण्याचे कारण म्हणजे स्मोकिंग. ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. स्मोकिंगच्या सवयीने तुमचे पोट आणि आतड्यांची चरबी हळूहळू वाढत जाते. यामुळे बेली फॅट कमी होत नाही. 

बीयर बेली फॅटचा मित्र

मोठ्या प्रमाणात बीअरचे सेवन तुमच्या पोटाची चरबी वाढवण्याचे काम करते कारण अल्कोहोलमध्ये कॅलरीज असतात. व्यायाम न करता सतत बीअर पिण्याची सवय ही आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक आहे. तुम्हाला जर बेली फॅट कमी करायचे असेल तसेच अन्य आजारांपासून दूर राहायचे असेल तर बीअरचे कमी प्रमाणात सेवन करा आणि नियमित व्यायाम करा. 

तणावाला ठेवा दूर

जेव्हा तणाव हार्मोन कॉर्टिसोपल आपल्या शरीरात असते तेव्हा फॅट्स वाढू लागते. जे पुढे जाऊन बेली फॅटच्या रूपात तुम्हाला त्रास देते. यासाठी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम करून तुम्ही तणाव दूर सारू शकता. योगाही चांगला पर्याय आहे. 

चुकीचा व्यायाम करणे

केवळ व्यायाम करणे उपयोगाचे नाही गरजेचे आहे की योग्य व्यायाम करणे. यासाठी तुम्ही एखाद्या प्रशिक्षकाची निवड करू शकता. जेणेकरून तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी योग्य व्यायाम सुचवेल. तसेच एरोबिक्स  हा व्यायाम प्रकार निवडा ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी