नवी दिल्ली: Side Effect Of Almond: ड्राय फ्रूटसमध्ये बदामाला (Almonds) खूप महत्त्व आहे. बदाम हे आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर असतं. बदामाचं झाड (Almond tree) मध्यम आकाराचे असून गुलाबी आणि पांढरी फुले येतात. बदामाचे सेवन मेंदूसाठी रामबाण उपाय मानले जाते. हे झाड डोंगराळ भागात जास्त आढळून येते. पाहिले तर बदामाची झाडे आशिया खंडातील इराण, इराक, मक्का, शिराझ इत्यादी ठिकाणी अधिक आढळतात. त्याचे योग्य सेवन केल्यास मेंदूतील न्यूरॉन्स सक्रिय करणे सोपे होते. जर तुम्हाला बदाम कसे सेवन (consume almonds) करावे हे देखील माहित नसेल तर आज आम्ही बदामाचे योग्य सेवन करण्याबाबत संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
या कारणांमुळे चुकून ही खाऊ नका सालासकट बदाम
अधिक वाचा- वजन कमी करायचं आहे?, मग खा 'बटाटा'
कसे करावे बदामाचे सेवन ?
बदामाचा वापर घरी पदार्थ बनवण्यासाठीही केला जातो. पण जे लोक रोज बदाम खातात त्यांच्यासाठी अशा प्रकारे बदामाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.