वजन कमी करायचेय तर रात्री चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

तब्येत पाणी
Updated Sep 15, 2020 | 15:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss: लठ्ठपणाच्या समस्येने हल्ली सारे त्रस्त आहेत. या लठ्ठपणाचे कारण म्हणजे आपली चुकीची लाईफस्टाईल. 

weight loss
वजन कमी करायचेय तर रात्री चुकूनही खाऊ नका हे पदार्थ 

थोडं पण कामाचं

  • रात्रीच्या जेवणात फास्ट फूड तसेच अधिक तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
  • रात्रीच्या वेळेस चॉकलेट खाऊ नये कारण यात कॅफेनचे प्रमाण अधिक असते.
  • नूडल्सचे सेवन रात्रीच्या वेळेस करू नये.

मुंबई: वजन वाढण्याची समस्या हल्ली साऱ्यांनाच सतावत आहे. याचे कारण म्हणजे आपली चुकीची लाईफस्टाईल(lifestyle). लठ्ठपणा(obesity) वाढल्याने आपली सुंदरता कमी होते आणि त्याचबरोबर आपण अनेक आजारांना आमंत्रणही देतो. वजन जर नियंत्रणात राखायचे असेल तर आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रात्रीच्या जेवणात फास्ट फूड तसेच अधिक तळलेले पदार्थ खाऊ नयेत. कारण यात मोठ्या प्रमाणात फॅट आणि कार्बोहायड्रेट्स असतात जे रात्रीचे नीट पचत नाहीत. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो तसेच वजनही वेगाने वाढते. तर जाणून घ्या वजन न वाढवण्यासाठी(weight loss) रात्रीचे कोणते पदार्थ खाऊ नयेत. 

शरीरासाठी हानिकारक आहे हे पाच पदार्थ

मसाले - रात्रीच्या वेळेस मसाल्याचे खाऊ नका. कारण मसाल्यांच्या अधिक सेवनाने आपले पोट खराब होते. यामुळे दुसऱ्या आजारांनाही निमंत्रण मिळते. अनेकांना अधिक तळलेले तसेच मसालेदार खाण्याची सवय असते. ज्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देतोच मात्र त्याचबरोबर वजनही वेगाने वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. 

चॉकलेट - चॉकलेट खायला साऱ्यांनाच आवडते. मात्र रात्रीच्या वेळेस चॉकलेट खाऊ नये कारण यात कॅफेनचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो. कमी झोप घेणे वजन वाढीसाठी निमंत्रण ठरू शकते. 

ब्रोकली - ब्रोकली खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र रात्रीच्या वेळेस याचे सेवन करणे हानिकारक असते. कारण ब्रोकलीमध्ये फायबर असते. रात्रीच्या वेळेस फायबर पचायला जड जाते. ज्यामुळे वजन वाढू शकते. 

तळलेले पदार्थ - रात्रीच्या वेळेस कधीही तळलेले पदार्थ खाऊ नका. कारण यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे पोटात अॅसिडिटी आणि वजन वाढण्याची समस्या निर्माण करू शकते.यामुळे रात्री तळलेले पदार्थ चुकूनही खाऊ नयेत.

नूडल्स - नूडल्सचे सेवन रात्रीच्या वेळेस करू नये. यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो तसेच वजन वाढवण्यास मदत होते. यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स असतात जे सहजरित्या पचत नाहीत. या कारणामुळे तुमचे वजन वेगाने वाढते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी