Bad Cholesterol कमी करायचेय? चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

तब्येत पाणी
Updated May 30, 2022 | 16:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cholesterol Control: जर तुम्हालाही तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची असेल तर चुकूनही हे ५ प्रकारचे खाद्य पदार्थ खाऊ नका.

cholestrol
Bad Cholesterol कमी करायचेय? चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ 
थोडं पण कामाचं
  • तेलकट पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. भारतात तेलकट पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात
  • अनेकदा खाणे बेक करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करतो. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते
  • जर तुम्ही प्रोसेस्ड मीटचे सेवन करत असाल तर तुम्ही कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवताय.

मुंबई: कोलेस्ट्रॉल हा असा पदार्थ आहे ज्यामुळे आपल्या शरीरात पेशी बनवण्यास मदत करतो. आपले लिव्हर शरीराची ही गरज पूर्ण करतात. मात्र अनेकदा आपण असे पदार्थ खातो ज्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि त्यामुळे हृदयाचे आजार, डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरसारखे आजार होतात. जर तुम्हालाही तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची असेल तर चुकूनही हे ५ प्रकारचे खाद्य पदार्थ खाऊ नका.never eat this 5 foods to reduce bad cholesterol

अधिक वाचा - वजन कमी करण्यासाठी जिरे अत्यंत फायदेशीर, असे करा सेवन

अनेकदा खाणे बेक करण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करतो. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते आणि हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. यासाठी बेकिंग सोड्याचा वापर प्रमाणातच केला पाहिजे. 

भारतात बटर खाण्याच्या शौकीनांची काही कमतरता नाही. अनेकदा पदार्थाची चव वाढवण्यासाठी बटरचा वापर भरपूर केला जातो. मात्र साधारणपणे बाजारात आढळणाऱ्या बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूप असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते. 

तेलकट पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. भारतात तेलकट पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. अशातच ही सवय लवकर सोडली तर बरे. मार्केटमध्ये मिळणारे तळलेले पदार्थ भले आपल्याला आवडत असले तरी मात्र हे पदार्थ आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक आहेत. 

मांस खाल्ल्याने शरीरास प्रोटीन मिळते. प्रोटीन शरीराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र जर तुम्ही प्रोसेस्ड मीटचे सेवन करत असाल तर तुम्ही कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवताय. यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. 

कोलेस्ट्रॉलवरील रामबाण उपाय लसूण

एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार अनेक मानव संशोधनातून हे समोर ाले आकी कच्चा लसूण कार्डिओव्हस्क्युलर डिसीजसाठी चांगल्या पद्धतीने काम करतो. लसूण हा एलडीएल-सी आणि ट्रायग्लिसराईज लेव्हा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. दररोज लसणाची अर्धा ते एक पाकळी सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी साधारण १० टक्क्यांपर्यंत कमी होते. 

अधिक वाचा - तुम्हीही आरोग्यासाठी रोज अंडी खात असाल तर सावधान!

लसूणची अर्धी पाकळीच पुरेशी

शरीरात जमा असलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही दररोज लसणाची अर्धी पाकळी खाल्ली पाहिजे. यासाठी लसूण पावडरचा वापर करू नका. पावडर बनवल्याने त्यातील सक्रिय योगिको संपतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी