मुंबई: कोरोना महामारीने(corona) आपल्याला सगळ्यांना दाखवून दिले की आरोग्य(health) किती महत्त्वाचे आहे. आजकालच्या या धावपळीच्या युगात फिट(fit) राहणे कोणाला आवडत नाही. फिट राहण्यासाठी केवळ जिमला जाणे गरजेचे नसते तर याशिवाय संतुलित आहार घेणेही तितकेच गरजेचे असते. तसेच शरीराचा लठ्ठपणा(obesity) जर वाढत असेल यामुळे अनेक घातक आजारांना निमंत्रण मिळू शकते. जसे टाईप २ डायबिटीज, सूजेसंबंधी आजार, हृदयाचे आजार. हिंदू पंचागानुसार श्रावण महिन्याची सुरूवात ही आषाढी अमावस्येनंतर होते. never eat this food during shravan fast for weight loss
अधिक वाचा - नाशकात मुसळधार पाऊस; गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
श्रावणात सोमवारचे व्रत हे कडक असते. भगवान शंकराला खुश करण्यासाठी दर सोमवारी व्रत केले जाते. अनेकांचा सोमवारचा कडक उपवास असतो. तुम्हालाही या वर्षी उपवासादरम्यान आपले वजन कमी करायचे आहे तर काही हेल्दी फूड्सचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता.
दही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दह्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढते. फळांमध्येही दही टाकून खाता येते. फळांमधून कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच फळांचा ज्यूसही फायदेशीर राहतो मात्र फळे खाण्याचा प्रयत्न करा. कारण फळातील कार्बोहायड्रेट्स सरळ शरीरापर्यंत पोहोचतात.
पनीर केवळ चविष्ट आहे म्हणून केले जात नाही तर पनीर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. पनीर दुधापासून बनवलेले असते. त्यामुळे तो प्रोटीनचा चांगला स्त्रोत असतो. पनीरमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि आर्यन ही पोषकतत्वे आढळतात. पनीरमध्ये सेलेनियम आणि पोटॅशियम असते जे मेंटल आणि फिजिकल हेल्थसाठी गरजेचे असते.
अधिक वाचा - ट्रक चालकानं नागिनचा हॉर्न ऐकताच तरुणांनी सुरू केला डान्स
नारळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे चरबी कमी करण्याचे काम करते. तसेच वजन घटवण्यासाठीही फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी नारळ खाल्ल्यास लवकर भूक लागत नाही. उपवासादरम्यान ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.