Unhealthy food for kids: सावधान! मुलांना चुकूनही देऊ नका हे पदार्थ, पडेल महागात

लहान मुलांचे खाण्यापिण्याचे लाड पुरवण्याकडे बहुतांश पालकांचा कल असतो. जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थ मुलांना विशेष आवडत असतात. मात्र हे पदार्थ खाण्यामुळे मुलांच्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही पदार्थांपासून मुलांना दूर ठेवण्याची गरज असते.

Unhealthy food for kids
मुलांना चुकूनही देऊ नका हे पदार्थ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लहान मुलांसाठी काही पदार्थ ठरतात धोकादायक
  • व्हाईट ब्रेड आणि गोड पेयांपासून मुलांना ठेवा दूर
  • चहा आणि कॉफीमुळे खुंटतो हाडांचा विकास

Unhealthy food for kids: आपल्या मुलांचा (Kids) प्रत्येक हट्ट पूर्ण करावा, असं प्रत्येक पालकाला (Parents) वाटत असतं. आपल्या लहानपणी आपल्याला जे मिळालं नाही, ते आपल्या मुलांना हमखास मिळावं, अशी पालकांची अपेक्षा असते. विशेषतः लहान मुलांचे खाण्यापिण्याचे लाड पुरवण्याकडे बहुतांश पालकांचा कल असतो. जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थ मुलांना विशेष आवडत असतात. मात्र हे पदार्थ खाण्यामुळे मुलांच्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही पदार्थांपासून मुलांना दूर ठेवण्याची गरज असते. जाणून घेऊया, मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरणारे असेच काही पदार्थ.

व्हाईट ब्रेड

व्हाईट ब्रेड तयार करण्यासाठी मैद्याचा वापर करण्यात येतो. हा ब्रेड दीर्घकाळ टिकावा, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. ब्रेड मध्ये मीठ आणि सोडियम यांचाही वापर करण्यात आलेला असतो. जास्त प्रमाणात व्हाईट ब्रेड खाण्यामुळे मुलांना खाज सुटणे, एलर्जी होणे, त्वचेवर ओरखडे उठणे अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

साखरयुक्त पदार्थ

बाजारात मिळणाऱ्या पेय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे लहान मुलांना लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित विकार जडण्याची शक्यता असते. अशा पदार्थांचे अधिक सेवन केल्यामुळे मुलांचे दात किडणे आणि हाडे कमजोर होणे यासारख्या समस्याही निर्माण होतात.

अधिक वाचा -  Body detoxification: शरीरात साठलेली घाण वेळीच करा साफ, डिटॉक्ससाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय

फळे आणि दही

फळे आणि दही या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी उत्तम असतात. मात्र या दोन्ही गोष्टी एकत्रित खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. या दोन्हींच्या एकत्रीकरणामुळे अनेक विषारी घटक निर्माण होतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे मुलांना दही आणि फळे या गोष्टी एकाच वेळी खायला देऊ नयेत.

कच्चे दूध आणि पनीर

कच्चे दूध आणि पनीर यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया असतात. लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा परिणाम होतो. शिवाय मुलांची आतडी नाजूक असल्यामुळे त्याचेही नुकसान होण्याची शक्यता असते.

चिप्स आणि क्रेकर्स

चिप्स आणि त्यासारख्या कुरकुरीत पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण सर्वाधिक असतं. मुलांच्या किडनीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

अधिक वाचा -  Remedies to postpone periods: मासिक पाळी लांबवण्याचे नैसर्गिक उपाय, औषधांशिवाय होईल काम

बिस्किटे आणि चॉकलेट

बिस्किटे आणि चॉकलेट यासारख्या वस्तू मुलांना देताना त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल, याचा साधा विचारही अनेक पालक करत नसल्याचे दिसते. या गोष्टींमुळे लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयाशी संबंधित विकार जडण्याचा धोका वाढतो.

कॅफिन

मोठ्या माणसांना चहा आणि कॉफी पिताना पाहून लहान मुलेही त्यासाठी हट्ट करतात. मात्र लहान मुलांना चहा कॉफी दिल्यामुळे त्यांचा हार्ट रेट वाढण्याची शक्यता असते. कॅफिन लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. शरीरात कॅफिन गेल्यामुळे हाडांना कॅल्शियम मिळण्याची शक्यता कमी होते. मुलांच्या हाडांच्या निकोप वाढीसाठी कॅल्शियम अत्यावश्यक असते.

Disclaimer: मुलांनी खावयाच्या पदार्थांबाबतच्या सामान्य ज्ञानावर आधारित या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न अथवा समस्या असतील तर तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी