new alarming revelation about deadly corona virus : कोरोना विषाणूचा नवा अवतार लोकांची चिंता वाढविणार आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन बीए पॉइंट टू हा विषाणू (Omicron BA.2 Virus) हा धोकादायक आहे. ज्यांनी कोवॅक्सिन अथवा कोविशिल्ड लसचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांना अद्याप कोरोना झालेला नाही अशा नागरिकांना नव्या विषाणूमुळे जास्त धोका आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी
लसचा दुसरा डोस घेऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असल्यास शरीरातील कोरोनाला प्रतिबंध करणारी प्रतिजैविके कमी झालेली असतात. या व्यक्तींना आधी कधीही कोरोना झालेला नसल्यामुळे शरीराची कोरोनाच्या कोणत्याही विषाणूचा हल्ला सहन करण्याची क्षमता ही पूर्णपणे लसवर अवलंबून आहे. यामुळेच कोवॅक्सिन अथवा कोविशिल्ड लसचा दुसरा डोस घेऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असेल तसेच आधी कोरोना झाला नसले तर संबंधित व्यक्तीने बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. ज्या लसचे दोन डोस घेतले आहेत त्याच लसचा बूस्टर डोस घेतला तर संबंधित व्यक्तीचे कोरोनापासून संरक्षण होण्याची शक्यता वाढेल. पण बूस्टर डोस घेतला नाही तर संबंधित व्यक्तीला कोरोनाचा धोका आहे; असेही तज्ज्ञांनी सांगितले.
आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी कोरोना विषाणूच्या नव्या अवताराचा प्रभाव आणि त्या विषाणूवर कोरोना प्रतिबंधक लसचा होणारा परिणाम या संदर्भात एक अभ्यास करुन अहवाल तयार केला. या ताज्या अहवालात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. कोरोनाचा ओमिक्रॉन बीए पॉइंट टू हा विषाणू (Omicron BA.2 Virus) हा धोकादायक आहे. ज्यांनी कोवॅक्सिन अथवा कोविशिल्ड लसचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांना अद्याप कोरोना झालेला नाही अशा नागरिकांना नव्या विषाणूमुळे जास्त धोका आहे, असे अहवालातून पुढे आले. लस घेऊन १८० दिवस झाल्यानंतर कोरोना झालेले २४ जण, कोरोना न झालेले पण लसचे दोन डोस घेतलेल १७ जण तसेच लस घेऊन १८० दिवस झाल्यानंतर कोरोना विषाणूच्या नव्या अवताराची बाधा झालेले ४६ जण या सर्वांच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाअंती बूस्टर डोस घेणे हिताचे असा एक निष्कर्ष अहवालातून काढण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचे नवे अवतार संसर्ग वेगाने पसरवत आहेत, असेही अभ्यासात आढळून आले. यामुळे ज्या लसचे दोन डोस घेतले आहेत त्याच लसचा बूस्टर डोस घ्या, असेही तज्ज्ञांनी सांगितले. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मास्क घालणे हिताचे असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.