Red Wine Benefit: संशोधनकर्ते म्हणतात रेड वाईन आरोग्यासाठी गुणकारी

तब्येत पाणी
Updated Aug 31, 2019 | 12:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

नुकतंच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून अशी माहिती समोर आली आहे की, जर रेड वाइनचं एक विशिष्ट प्रमाणात सेवन केल्यास ती आरोग्यासाठी गुणकारी ठरु शकते. 

RED_WINE
Red Wine Benefit: संशोधनकर्ते म्हणतात रेड वाईन आरोग्यासाठी गुणकारी  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • रेड वाइन योग्य प्रमाणात घेतल्यास ठरु शकतं गुणकारी
  • संशोधनकर्त्यांच्या मते रेड वाइन हे मायक्रोब्समधील जीवाणूंची संख्या प्रमाणात ठेवतं 
  • रेड वाइनमधील पॉलिफिनोल्स मायक्रोब्ससाठी इंधनाप्रमाणे काम करतं

मुंबई: संशोधनकर्त्यांच्या मते, जी लोकं विशिष्ट प्रमाणात रेड वाइनचं सेवन करतात त्यांच्या मायक्रोबायोटातील विविधेतीत वाढ होते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाचा स्तर कमी होतो. लंडनच्या किंग्स कॉलेजच्या कॅरोलिन रॉय यांचं म्हणणं आहे की, 'योग्य प्रमाणात रेड वाइनचं सेवन केल्यास मायक्रोबायोटातील विविधता जी आंशिक रुपाने स्वास्थाविषयी लाभदायक प्रभावांची व्याख्या निश्चित करते.' 

खराब जीवाणूंच्या तुलनेमध्ये चांगल्या जीवाणुंच्या असंतुलनामुळे अनेक प्रकृतीविषयी समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. जसं की, कारक-प्रतिकारक क्षमता कमी होणं, वजन वाढणं किंवा जास्त कोलेस्ट्रॉल. एका व्यक्तीच्या मायक्रोबायोटामधील बॅक्टेरियातील विभिन्न प्रजातींच्या उच्च संख्या हे स्वस्थ प्रकृतीचं प्रतीक मानलं जातं. 

गॅस्ट्रोएंटरोलॉजी मासिकातील प्रकाशित एक संशोधनात संशोधनकर्त्यांच्या एका टीमने मायक्रोबायोटावर बीयर, साइडर, रेड वाइन, व्हाइट वाइन आणि स्पिरिट यांचा नेमका काय परिणाम होतो यावर रिसर्च केलं. त्यावेळेस त्यांना असं आढळून आलं की, जी लोकं रेड वाइनचं सेवन करत नाहीत त्यांच्या तुलनेत रेड वाइनचं सेवन करणाऱ्यांचं मायक्रोबायोटा अधिक प्रमाणात विविध आहे. 

दरम्यान, संशोधनकर्त्यांना असंही जाणवलं आहे की, रेड वाइनचं सेवन करणाऱ्या मायक्रोबायोटामद्ये जीवाणूंच्या विविध प्रजाती या मोठ्या संख्येने आढळून येतात. त्यांच्या मते, असं शक्यतो रेड वाइनमधील अधिक प्रमाणात असणाऱ्या पॉलीफिनोल्समुळे होऊ शकतं. 

पॉलिफिनोल्स हे एक केमिकल आहे की, स्वाभाविकरित्या अनेक फळं आणि भाज्यांमध्ये असतं. यामध्ये अँटिऑक्सिडेंट्ससह अनेक लाभदायक तत्वांचा समावेश अशतो. त्यामुळे आपल्या शरीरात असणाऱ्या मायक्रोब्ससाठी ते एका इंधनाप्रमाणे काम करतं. आजवर अनेक संशोधनांमधून ही गोष्ट समोर आली आहे की, रेड वाइन ही प्रकृतीसाठी चांगली ठरु शकते. कारण की, यामध्ये काही महत्त्वाचे आणि पोषक घटक असतात. पण असं असलं तरी वाइन किती प्रमाणात घ्यावी याचं देखील प्रमाण आहे. त्यामुळे अतिप्रमाणात वाईनंच सेवन करणं हे शक्यतो टाळावं. अनेकदा वाईन ही द्राक्षांपासून बनवली जाते. पण आता इतर फळांपासून देखील वाइन तयार केली जाते. वाइनमध्ये अनेक प्रकार असतात. त्यामुळे कोणत्या प्रकारची वाइन घ्यावी याविषयी तज्ज्ञांकडून योग्य सल्ला घेणं देखील गरजेचं आहे. 

टीप: प्रस्तुत लेखात सुचविण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ला हे केवळ साधारण माहितीसाठी आहे. त्यामुळे तो तज्ज्ञांचा सल्ला आहे असं मानू नये. त्यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...