Weight Loss करण्यासाठी आता नाही घाम गाळण्याची गरज; फक्त खाण्या- पिण्याच्या सवयींमध्ये करा बदल

अनेक लोक वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी प्रयत्न करत असतात.

No need to sweat anymore to lose weight
Weight Loss करण्यासाठी आता नाही घाम गाळण्याची गरज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अनेक लोक वजन कमी करण्यासाठी नियमीत डाएट आणि व्यायाम करतात.
  • पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते.

मुंबई : अनेक लोक वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी प्रयत्न करत असतात. वजन कमी करण्यासाठी नियमीत डाएट आणि व्यायाम अनेक लोक करतात. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जिम लावतात. जिममध्ये जाऊन एक्सरसाइज (Exercise) केल्याने वजन कमी होऊ शकते असे अनेकांचे मत आहे. पण व्यायाम न करता देखील तुम्ही वजन कमी करू शकाता. जाणून घ्या ही सोपी ट्रिक 

शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा

पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढेल.

स्वत: तयार करा जेवण

दुसऱ्यांनी तयार केलेले जेवण खाण्यापेक्षा स्वत: तयार केलेले जेवण जेवा. त्याचे कारण असे आहे की, जर तुम्ही स्वत: तयार केलेले जेवण जेवलात तर तुम्ही मसाल्याचे त्यामध्ये प्रमाण व्यवस्थित टाकू शकता. तुम्हाला जे पदार्थ योग्य वाटतील त्याच पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा

वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करा. तेलकट पदार्थ आणि जंक फूडमुळे वजन वाढते. आहारामध्ये वेगवेगळ्या फळांचा समावेश करा. तसेच पॅक फूड खाऊ नये. 

झोप पूर्ण करा

जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या वजनावर होतो. झोप पूर्ण न झाल्याने हार्मोनल बदल होतात. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. 
 

(टिप- वरील माहितीची पुष्टी टाइम्स नाऊ मराठी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी