बापरे... जगातील सर्वांना २०२४ पर्यंत मिळणार नाही कोरोनाची लस! 

Serum Institute of India: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पूनावाला म्हणाले की, जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहचण्यासाठी २०२४ साल उजाडेल

covid_19_Vaccine
बापरे... जगातील सर्वांना २०२४ पर्यंत मिळणार नाही कोरोनाची लस!   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • जगातील सर्व लोकांपर्यंत लस पोहचण्यासाठी ४ ते ५ वर्षे लागतील: पूनावाला
  • जर लसच्या दोन डोसची आवश्यकता असेल तर जगात एकून १५ अब्ज डोसची आवश्यक भासेल
  • कोविड-१९ वरील लस पुढील वर्षाच्या सुरूवातीस उपलब्ध होऊ शकतेः केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली: या वर्षाच्या अखेरीस कोविड-१९ लस (corona vaccine) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण याच दरम्यान लसीचे उत्पादन करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या अखेरीपर्यंत जगात प्रत्येकासाठी पुरेशा प्रमाणात कोरोना व्हायरस लस उपलब्ध होणार नाही. फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) म्हणाले की, फार्मा कंपन्या (Pharma Company) वेगाने उत्पादन क्षमता वाढवू शकत नाहीए. ज्यामुळे जगभरातील लोकांना कमीत कमी वेळेत ही लस कमी उपलब्ध करुन देता येणार नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहचण्यासाठी साधारण चार ते पाच वर्ष लागण्याची शक्यता आहे.

पूनावाला यांनी पूर्वीच असा अंदाज व्यक्त केला होता की, कोरोनो व्हायरससाठी जर दोन डोसच्या लसची गरज असेल ज्याप्रमाणे गोवर किंवा रोटावायरस यावर एक किंवा दोन लस दिली जाते. त्याचप्रमाणे जर कोरोना व्हायरससाठी देखील दोन लसची गरज असेल तर संपूर्ण जगाला १५ अब्ज डोसची गरज भासेल. यावेळी त्यांनी भारतात लस वितरणाबाबतही चिंता व्यक्त केली. पूनावाला म्हणाले की, 'मला अद्याप कागदावर एक योग्य योजना दिसत नाही. या लसीबाबत असं होऊ नये की, आपल्या देशाची क्षमता आहे पण आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने व्हॅक्सीनसाठी जगातील ५ कंपन्यांसोबत करार केला आहे. ज्यामध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि नोव्हाव्हॅक्स यांचा देखील समावेश आहे. सीरम या कंपन्यांसह मिळून १ अब्ज डोस तयार करण्यासाठी सहकार्य करेल. त्यातील ५० टक्के डिलिव्हरी भारतात दिली जाणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आशा व्यक्त केली होती की, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कोव्हिड-१९ची लस तयार करण्यात येईल. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, कोरोना व्हायरसविरूद्ध लस पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१ च्या सुरूवातीला येईल. आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्याने असेही म्हटले की, या लसीचा पहिला डोस घेण्यास मला नक्कीच आनंद वाटेल. जेणेकरून कोणालाही या लसीबाबत अविश्वास वाटू नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी