Weight loss Soup द्वारे लठ्ठपणा झटपट दूर करण्याचे हे आहेत टिप्स, बनवण्याची पद्धत जाणून घ्या

तब्येत पाणी
Updated Mar 17, 2023 | 19:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tips वाढते वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी आहार तज्ज्ञाद्वारे सुचविण्यात येणाऱ्या ओट सूप, या वेट लॉस रेसिपीबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.

ओट्स झोप येण्यासाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन आणि कॉम्पेलक्स कार्ब्स ट्रिप्टोफनच्या संख्येत वाढ करते. जेणे करून झोप चांगली येते.
तुम्ही या पद्धतीमध्ये जर ओट्स सूप बनवून खालले तर तुमचे वजन झटपट कमी होईल.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ओट्स मुळे पोटाचे आरोग्य सुधारते
  • कफ किंवा पित्तासारखी समस्या उद्भवत नाही.
  • ओट्स च्या सेवनामुळे निद्रा नाश सारखी समस्या उद्भवत नाही.

Weight loss tips : महिला असो वा पुरुष असो, वाढत्या वजनाच्या समस्येमुळे प्रत्येकजण त्रस्त आहेत.  या लठ्ठपणेमुळे शरीर बेढब तर दिसू लागतेच, पण त्याबरोबरच शुगर, हाइपरटेंशन, थायराइड यांसारख्या समस्या देखील घर करू लागतात. त्यामुळे वेळीच वाढते वजन कमी करून निरोगी राहण्यासाठी आहारतज्ञाद्वारे सुचवलेले (Dietician weight loss tips) वेट लॉस ओट्स विषयी आम्ही या लेखात बोलणार आहोत. या लेखाद्वारे वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी ओट्स बनविण्याची पद्धत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

हे पण वाचा :  Mhada lottery 2023 । म्हाडा लॉटरीच्या घरांसाठी नियमात मोठा बदल, जाणून घ्या काय आहे नवीन निर्णय ?

वेट लॉस ओट्स रेसिपी | oats recipe for weight loss

  • वेटलॉस ओट्स बनवण्यासाठी तुम्हाला एक कापलेला गाजर, एक कापलेली शेंग, एक टोमेटो, किसलेलं आलं. धने, बारीक कापलेला फ्लॉवर आणि एक चमचा तूप तसेच छोटी वाटी ओट्स लागेल.
  • आता तुम्हाला एका कढई मध्ये तूप गरम करून घ्यायचे आहे, त्यानंतर किसलेले आले टाकून त्यावर सर्वप्रकारच्या कापलेल्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. मग त्यामध्ये ओट्स टाकून देत, वाटीभर पाण्यात ते चांगल्याप्रकारे शिजवून घ्यायचे आहे. अश्याप्रकारे गरमागरम सूप तयार असून, तुमच्या खाण्यासाठी अगदी योग्य आणि रुचकर असे ते लागते. तुम्ही या पद्धतीमध्ये जर ओट्स खालले तर तुमचे वजन झटपट कमी होईल.

हे पण वाचा :  Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी प्या ओव्याचे पाणी, वाढत्या चरबीवर लागेल फुल स्टॉप

ओट्स चे फायदे | Oats benefits

  • ओट्स मुळे पोटाचे आरोग्य सुधारते. यामुळे कफ किंवा पित्तासारखी समस्या येत नाही. मल निसरणला अधिक त्रास हॉत नाही.  यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात आणता येऊ शकते. ह्याचे सेवन केल्यामुळे टाइप २ चा मधुमेह नियंत्रित होतो.

ओट्स च्या सेवनामुळे निद्रा नाश सारखी समस्या उद्भवत नाही. झोप येण्यासाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन आणि कॉम्पेलक्स कार्ब्स ट्रिप्टोफनच्या संख्येत वाढ होते. जेणे करून झोप चांगली येते

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी