Omicron Severe Symptoms: भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. एक्सबीबी 1.16 मुळे कोरोना बाधितांच्या संख्येत ही वाढ झपाट्याने होत आहे. अवघ्या 12 दिवसांत कोविड बाधितांची दैनंदिन संख्या 3 हजारांहून थेट 8 हजारांवर पोहोचली आहे. ताज्या कोरोना आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 7830 बाधितांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 40215 इतकी आहे.
सध्याच्या काळात ओमिक्रॉन एक्सबीबी 1.16 व्हेरिएंट सर्वात आक्रमक आहे. या व्हेरिएंटची लागण झाल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावं लागत आहे. आरोग्य मंत्रालयाने सविस्तर सांगितले की, कोणत्यावेळी कोणती लक्षणे दिसल्यास रुग्णालयात किंवा आयसीयूमध्ये भरती होणे गरजेचे आहे.
हे पण वाचा : तेल लावल्यानंतरही केस का गळतात? वाचा कारणे आणि उपाय
आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, श्वासोच्छवासाचा त्रास किंवा ऑक्सिजनची कमतरता आणि त्यासोबतच अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची लक्षणे दिसू लागल्यास घरी आयसोलेट होणे पुरेसे आहे. या लक्षणांमध्ये ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे याचा समावेश आहे.
जर तुमची ऑक्सिजन लेवल 93 टक्के ते 90 टक्के या दरम्यान आहे आणि रेस्पिरेटरी रेट 24 प्रति मिनिट याच्या बरोबर किंवा जास्त आहे तर तुम्हाला रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे.
हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?
मंत्रालयानुसार, जर श्वासोच्छवासाचा दर म्हणजेच रेस्पिरेटरी रेट 30 प्रति मिनिटहून जास्त असेल आणि खोलीतील सामान्य हवेतील ऑक्सिजनची पातळी 90 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एचडीयू किंवा आयसीयूची आवश्यकता असू शकते.
मंत्रालयानुसार, हा सल्ला प्रत्येक परिस्थिती आणि रुग्णांसाठी योग्य नाही. यासोबतच डॉक्टरांचे मत आणि सूचना आवश्यक आहेत. कारण, तुमच्या आरोग्याचा आणि आजाराचा अचूक अभ्यास करुन तो योग्य सल्ला देऊ शकतो.
हे पण वाचा : या 10 भाज्या आहेत कॅन्सरच्या शत्रू, खाल्ल्यास कर्करोगाचा धोका होईल दूर
ऑक्सिजन पातळी किंवा श्वासोच्छवासाचा दर मोजण्यासाठी तुम्ही आरामदायक स्थितीत असणे आवश्यक आहे. यासोबच पुरेशी हवा असलेल्या खोलीत असले पाहिजे. त्यावेळी तुम्ही मोजमाप करु शकता.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)