International Tea Day: लठ्ठपणा कमी करतो ‘या’ ४ प्रकारचा चहा, जाणून घ्या अधिक फायदे

तब्येत पाणी
Updated May 21, 2020 | 20:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

आज जागतिक चहा दिवस आहे. चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठीही चहाचा विशेष वापर होऊ शकतो. पण चहा कोणता प्यावा, जाणून घ्या याबद्दल खास माहिती...

International Tea Day
लठ्ठपणा कमी करतो ‘या’ ४ प्रकारचा चहा, जाणून अधिक घ्या फायदे  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • चहा प्यायल्यानं वजन होऊ शकतं कमी
  • कुठला चहा प्यायल्यानं काय होतात फायदे जाणून घ्या.
  • चार प्रकारच्या चहांची माहिती बघा.

International Tea Day: चहाच्या कपासोबत आपली सकाळ होते आणि पूर्ण दिवस आनंदात जातो. असे अनेक लोकं आहेत ज्यांचा पूर्ण दिवसाचा मूड हा सकाळच्या चहावर अवलंबून असतो. जर सकाळी पहिला चहा चांगला मिळाला नाही, तर अनेक जणांचा मूड आणि दिवसच खराब जातो. तर मस्त चहा सकाळी सकाळी मिळाला तर दिवस अगदी आनंदात जातो. अनेक जण सकाळी दूध घातलेला चहा पिणं पसंत करतात. तर काही जणांना लिंबू घातलेला चहा आवडतो. आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे म्हणून जाणून घेऊया इतर प्रकारच्या चहांबद्दल...

आजकाल लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणा वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अनेक जण या समस्येमुळे त्रस्त आहेत. लोकं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तर डॉक्टर सुद्धा लठ्ठपणा कमी करण्यासाठी अधिक द्रव पदार्थ आपल्या डाएटमध्ये सामिल करण्याचा सल्ला देत असतात. सोबतच दूध घालून केलेल्या चहापासून दूर राहा, असा सल्ला पण देतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी बाहेरचं जेवण, जंक फूड खाणं सोडतात पण चहा मात्र सोडत नाहीत. आज आम्ही काही अशा चहाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे आपण लठ्ठपणा कमी करून आरोग्य सुधारू शकता.

दालचिनीचा चहा

दालचिनी म्हणजेच कलमीचा चहा आरोग्यासाठी अनेक फायदेशीर ठरतो. दालतीनीचा चहा पिण्याचे अनेक फायदे रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास होतात. अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुण कलमीच्या चहात असतात. दालचिनी म्हणजेच कलमीचा चहा आपण मधासोबत पण पिऊ शकता. यामुळे आरोग्य उत्तम राहतं.

कॅमोमाईल चहा

कॅमोमाईलचा चहा वजन कमी करण्यासाठी खूप सहाय्यक ठरतो. अनेक औषधयुक्त गुण कॅमोमाईलच्या चहात असतात. कॅल्शिअम आणि पोटॅशियम पण यात असतं. एक ग्लास गरम पाण्यात आपण कॅमोमाईल टाकून झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी हा चहा प्यावा. हा चहा प्यायल्यानंतर चांगली झोप येते आणि आपल्या शरीरातील चरबी कमी होण्यासही याचा फायदा होतो.

मेथीच्या दाण्याचा चहा

मेथीचे दाणे पाण्यात मिसळून चहा बनवावा. या चहामुळे लठ्ठपणा कमी होतो. डॉक्टरांनुसार मेथीचे दाणे पाण्यात भिजवून प्यायल्यास चरबी घटते. शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम मेथी करते, त्यामुळे फॅट बर्न होतं. अँटी अॅसिड मेथी दाण्यात असतं, त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. पाण्यात मेथी दाण्याची पूड भिजवून आपण झोपण्याच्या अर्धा तास आधी प्यावं.

हळदीचा चहा

हळदीचा चहा करण्यासाठी दोन कप पाणी उकळून घ्यावं आणि नंतर त्यात एक इंच हळकुंड घालावं. जर आपल्याजवळ हळकुंड नसेल तर एक चमचा हळदीचं पावडर टाकू शकता. २ ते ३ मिनीटांपर्यंत पाणी उकळल्यानंतर हे पाणी एका कपात घेऊन त्यात मध आणि मीरेपूड टाकावी. दररोज सकाळी नाश्ता करण्यापूर्वी हा चहा प्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी