Oncolytic Virus: हा विषाणू कर्करोगाचा करेल नायनाट, मानवांवर करण्यात आली पहिली क्लिनिकल चाचणी

कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात. परंतु या महाभयानक आजारावर लवकरच औषध मिळण्याची शक्यता आहे, तेही एका व्हायरसच्या माध्यामातून. हो, नुकताच काही डॉक्टरांनी क्लिनिकल चाचणी दरम्यान एका मानवाला ऑनकोलिटिक विषाणूचं इंजेक्शन देण्यात आलं आहे.

Oncolytic Virus: This virus will kill cancer
Oncolytic Virus: हा विषाणू कर्करोगाचा करेल नायनाट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ऑनकोलिटिक विषाणू शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो.
  • व्हायरस आपल्या पेशींना संक्रमित करतात आणि नंतर प्रतिकृती तयार करण्यासाठी सेलच्या अनुवांशिक यंत्रांचा वापर करतात
  • कर्करोगाला मारणाऱ्या व्हायरसला व्हॅक्सिनिया (Vaccinia) च्या नावाने ओळखले जाते.

Oncolytic Virus Therapy: कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात. परंतु या महाभयानक आजारावर लवकरच औषध मिळण्याची शक्यता आहे, तेही एका व्हायरसच्या माध्यामातून. हो, नुकताच काही डॉक्टरांनी क्लिनिकल चाचणी दरम्यान एका मानवाला ऑनकोलिटिक विषाणूचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. ज्याचा उद्देश शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे हा आहे. या विषाणूचा प्राण्यांवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. संशोधनानुसार या उपचाराला ऑन्कोलिटिक व्हायरस थेरपी म्हणतात.

कर्करोगाच्या पेशी नष्ट करते

ऑन्कोलिटिक व्हायरस (Oncolytic Virus) इम्यूनोथेरेपी (Immunotherapy) कर्करोगाचा एक प्रकार, जो कर्करोगाच्या पेशींना संक्रमित करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी व्हायरसचा उपयोग होतो. व्हायरस आपल्या पेशींना संक्रमित करतात आणि नंतर प्रतिकृती तयार करण्यासाठी सेलच्या अनुवांशिक यंत्रांचा वापर करतात, असं निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे. 

100 रुग्णांवर चाचणी केली जाईल

दरम्यान कर्करोगाला मारणाऱ्या व्हायरसला व्हॅक्सिनिया (Vaccinia) च्या नावाने ओळखले जाते. हे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी आणि निरोगी पेशी वाचवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ही चाचणी पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागतील, असा उल्लेख न्यूजवीकच्या अहवालात करण्यात आला आहे. या अंतर्गत संपूर्ण यूएसमध्ये 100 कॅन्सर रुग्णांची तपासणी केली जाईल.

रोगप्रतिकारक शक्तीला मदत 

कर्करोग संशोधन कंपनी Imugene Limited त्यानुसार या उपचारामुळे लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीला कॅन्सरविरुद्धही मदत होऊ शकते. ही कंपनी व्हायरसची लस विकसित करत आहे. त्याचे पूर्ण नावCF33-hNIS VAXINIA आहे

तज्ज्ञांनी आशा

EurekAlert च्या अहवालानुसार, ट्यूमर विरुद्धच्या या ऑन्कोलिटिक व्हायरस थेरपी चाचणीच्या पहिल्या टप्प्यापासून, तज्ञांना आशा आहे की हा विषाणू कर्करोगाविरूद्ध शरीराची प्रतिकारशक्ती वाढवेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी