Milk for diabetes: रोज एक ग्लास दूध, डायबेटिस राहिल दूर!

दूध पिण्याने मधुमेह नियंत्रणात राहायला मदत होत असल्याचं एका संशोधनातून दिसून आलं आहे. रोज एक ग्लास दूध आणि काही डेअरी प्रॉडक्ट्स फायद्याची ठरत असल्याचं सिद्ध झालं आहे.

Milk for diabetes
रोज एक ग्लास दूध, डायबेटिस राहिल दूर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रोज एक ग्लास दूध ठरते फायदेशीर
  • कमी होतो मधुमेहाचा धोका
  • रोज 200 ग्रॅम डेअरी प्रॉडक्ट खाणे योग्य

Milk for diabetes: मधुमेह (Diabetes) हा जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारतीयांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार आहे. भारतात गेल्या काही वर्षात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत असून अनेकांना तरुण वयातच हा आजार जडत असल्याचं दिसून आलं आहे. रोज एक ग्लास दूध (One glass milk) पिण्याने हा आजार दूर राहत असल्याचं नव्या संशोधातून दिसून आलं आहे. भारतात गेल्या काही वर्षात बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि झोपेच्या चुकीच्या वेळा यामुळे मधुमेह होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेकदा आपल्याला मधुमेह झाला आहे, हे अनेकांना फार उशीरा कळतं. नियमितपणे चाचण्या न केल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढत चालल्याची जाणीवही अनेकांना होत नाही. मात्र रक्तातील साखरेची पातळी प्रमाणापेक्षा जास्त झाली, तर दृष्टीवरही त्याचा परिणाम होत असतो. त्याचप्रमाणं इतरही अनेक आजार सुरु होतात. हे टाळण्यासाठी दूध आणि इतर डेअरी उत्पादनांचा फायदा होत असल्याचं नव्या संशोधनातून दिसून आलं आहे. 

काय आहे संशोधन?

युरोपीय युनियनकडून डायबेटिसवर करण्यात आलेल्या संशोधनातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा तसंच डेअरी प्रॉडक्टचा मधुमेही रुग्णांवर काय परिणाम होतो, याबाबत हे संशोधन कऱण्यात आलं होतं. त्यानुसार दररोज एक ग्लास दूध पिणाऱ्या व्यक्तींना मधुमेह होण्यापासून संरक्षण मिळत असल्याचं या संशोधनातून दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे दररोज 200 ग्रॅमपर्यंत डेअरी प्रॉडक्टचं सेवन सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. दुधात असे अनेक घटक असतात, जे रक्तातील ग्लुकोजचं ऊर्जेत रुपांतर करण्यासाठी फायदेशीर ठरतात, असं या संशोधनात दिसून आलं आहे. त्यामुळे रक्तात साखर साठून राहण्याचं प्रमाण कमी होतं आणि मधुमेह होण्याचा धोका कमी होत असल्याचं त्यातून दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - Health Tips : सकाळी लवकर उठायची इच्छा असते मात्र जमत नाही...वापरा या 5 टिप्स, व्हाल अर्ली बर्ड

का होतो मधुमेह?

जेव्हा शरीरात येणारी साखर किंवा ग्लुकोज ही पेशींपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया मंदावते, तेव्हा मधुमेहाला सुुरुवात होते. आपल्या अन्नावाटे रक्तात ग्लुकोजची निर्मिती होत असते. शरीरात तयार होणाऱ्या इन्सुलीनमार्फत हे ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे या ग्लुकोजचं ऊर्जेत रुपांतर होतं. मात्र रक्तातील साखर तयार होण्याचं प्रमाण वाढलं, तर मात्र तयार होणारं ग्लुकोज साठून राहायला सुरुवात होते. त्यामुळे शरीराकडून नैसर्गिकरित्या इन्सुलीन सोडण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे रक्तातील साखर पेशींपर्यत न पोहोचता ती रक्तातच साठून राहते. त्यासाठी बाहेरून इन्सुलीन देण्याची गरज निर्माण होते. 

अधिक वाचा - Weight Loss Mistakes:  वजन कमी करण्यासाठी टाळा या चुका, अन्यथा मेहनत होईल बरबाद

डायबेटिसचा धोका होईल कमी

डायबेटिसचा धोका कमी करण्यासाठी दूध आणि डेअरी प्रॉडक्टचा मर्यादित स्वरुपात वापर कऱण्याचा सल्ला दिला जातो. रोज एक ग्लास दूध आणि काही डेअरी प्रॉडक्ट्स फिट राहण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र त्यांच्या अतिरेकी सेवनाने मधुमेहाचा धोका वाढत असल्याचंही दिसून आलं आहे. 

डिस्क्लेमर - संशोधनातून समोर आलेल्या या सामान्य नोंदी आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी