जगातील 10 पैकी एकाला होता वर्टिगो आजार, काय आहे हा आजार जाणून घ्या याचे परिणाम

वर्टिगो सामान्य आहे जगभरातील 10 पैकी एकाला त्याच्या आयुष्यात या आजाराचा अनुभव येत असतो. भारतात वर्टिगोचे प्रमाण जवळपास 0.71  टक्‍के आहे, म्‍हणजेच 9 दशलक्षपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना या आजाराचा त्रास आहे.  60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 30 टक्के  व्यक्‍तींमध्ये आणि  85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 50 टक्‍के व्‍यक्‍तींमध्ये  या आजाराचा त्रास दिसून येतो. तसेच महिलांना वर्टिगो आजार होण्‍याची शक्यता दोन ते तीन पट जास्त असते.

What is vertigo disease, know the effects
काय आहे हा वर्टिगो आजार, जाणून घ्या याचे परिणाम  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • वर्टिगो सामान्य आहे जगभरातील 10 पैकी एकाला त्याच्या आयुष्यात या आजाराचा अनुभव येत असतो.
  • भारतात वर्टिगोचे प्रमाण जवळपास 0.71 टक्‍के आहे, म्‍हणजेच 9 दशलक्षपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना या आजाराचा त्रास आहे.
  • शरीरात रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे व्हर्टिगोचा झटका येऊ शकतो.

मुंबई :  वर्टिगो ही एक सामान्य समस्या आहे. हे कदाचित गर्भाशयाच्या (uterus) ग्रीवेच्या  समस्या असेल, डोकेदुखी (headache) किंवा कानाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास या आजाराचा त्रास होत असतो. चक्कर (dizziness) आल्यास आपल्या शरीराला मळमळ आणि उलट्या यांसारख्या विविध समस्या जाणवतात. चक्कर आल्यास जर तुम्ही डोके वळवले तर ही जास्त स्थिती खराब होते आणि तुमचे डोके अधिक वेगाने फिरत असते. या आजारामुळे शरीराच्या (body) वेस्टिब्युलर प्रणालीमध्ये अडथळा निर्माण होतो, जी अंतर्गत जीपीएस म्हणून कार्य करते आणि संतुलन राखण्यासाठी जबाबदार असते. चेतावणीशिवाय चक्कर येऊ शकते, पडणे आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.  (One in 10 people in the world suffer from vertigo, know the what is the vertigo)

अधिक वाचा  : प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण: विद्यार्थ्याला नग्न करत मारहाण

वर्टिगो सामान्य आहे जगभरातील 10 पैकी एकाला त्याच्या आयुष्यात या आजाराचा अनुभव येत असतो. भारतात वर्टिगोचे प्रमाण जवळपास 0.71  टक्‍के आहे, म्‍हणजेच 9 दशलक्षपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना या आजाराचा त्रास आहे.  60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 30 टक्के  व्यक्‍तींमध्ये आणि  85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 50 टक्‍के व्‍यक्‍तींमध्ये  या आजाराचा त्रास दिसून येतो. तसेच महिलांना वर्टिगो आजार होण्‍याची शक्यता दोन ते तीन पट जास्त असते.या आजराचा त्रास होत असेल तर घराभोवती फिरणे, किराणा सामान खरेदी करणे, कामावर जाणे यांसारखी नित्याची कामे चक्कर आल्याने आव्हानात्मक ठरतात. 

अधिक वाचा  : चाणक्याच्या या नीतिचा जीवनात करा अवलंब मिळेल श्रीमंती

काय आहेत या आजाराची लक्षणे 

  • चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार होणे. 
  • जास्त घाम येणे
  • दिवसभर अशक्तपणा जाणवतो.
  • मोठ्या आवाजामुळे डोकेदुखी सुरू होते.
  • चालताना तोल सांभाळता येत नाही.
  •  कमी ऐकू येणे
  • उंचीची भीती.
  • सतत पडल्याची भावना.

का होतो हा आजार 

शरीरात रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे व्हर्टिगोचा झटका येऊ शकतो,  चक्कर येते. सततच्या कामामुळे जेवण टाळण्याची चूक हेही यामागे मोठे कारण आहे. कारण शरीराला काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळत नाही.  याशिवाय जास्त टेन्शन घेतल्यानेही असे होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हर्टिगोचे परिणाम अल्पकालीन असू शकतात आणि दीर्घकाळ टिकू शकतात.या वर्टिगो आजाराचा एखाद्या व्यक्तीच्या कामावर देखील परिणाम होऊ शकतो, परिणामी नोकरी बदलणे किंवा सोडणे, कार्यक्षमता कमी होणे आणि कामाचे दिवस गमावणे अशा परिणामांसह व्‍यक्‍तींवर आर्थिक परिणाम होऊ शकतो. 

अधिक वाचा  :तुमच्या घरात पाल फिरते का? तुम्हाला मिळू शकते आनंदाची बातमी

या आजाराचे प्रमाण जास्त असूनही या स्थितीबद्दल जागरुकतेचा अभाव आहे.  सामान्य चक्कर येणे यासारख्या दैनंदिन समस्यांकडे व्यक्ती सहसा दुर्लक्ष करतात, ज्यामुळे प्राथमिक काळजी स्तरावर वर्टिगोचे निदान होणे अवघड जाते. या आजाराची लक्षणे वर्णन व प्रमाणित करणे अवघड आहेत. तसेच मळमळ व उलट्या सारखी लक्षणे इतर स्थितींच्‍या संदर्भात स्‍पष्‍टपणे दिसून येणे अवघड असल्‍यामुळे वर्टिगोचे निदान होणे अवघड ठरू शकते. म्हणूनच, लवकर निदान आणि प्रभावी उपचार पर्यायांना मदत करण्यासाठी या आजाराबाबत जागरूकता वाढवण्याची गरज आहे.

प्रा.डॉ. समीर भार्गव, सल्लागार-पीडी हिंदुजा हॉस्पिटल, माजी अध्यक्ष, असोसिएशन ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट ऑफ इंडिया म्‍हणाले, ‘’वर्टिगोबाबत जागरूकता वाढवण्‍याची गरज आहे, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना लवकरात लवकर मदत मिळू शकेल. हे अत्‍यंत महत्त्वाचे आहे, कारण हे विविध आरोग्‍यविषयक आजारांचे लक्षण असू शकते,  ज्‍यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होण्‍यासोबत फ्रॅक्‍चर्स किंवा चक्‍कर येऊन पडणे असे गंभीर आजार होऊ शकतात. व्‍यायाम व वैद्यकीय उपचार व्‍यक्‍तींना त्‍यांची जीवनशैली सुधारण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये लाभदायी ठरू शकतात.’’ 

चक्कर येणे यावर  उपचार

जेव्हा चक्कर येते तेव्हा डॉक्टर काही दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला देतात आणि यामुळे खूप आराम मिळतो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची खूप काळजी वाटत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. समस्या गंभीर असल्यास एंटीबॉयोटिक औषध सुद्धा देत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी