Uric Acid | चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे सध्या अनेकांना रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्याचा अनुभव येत असतो. वरवर पाहता ही सामान्य गोष्ट वाटत असली तरी युरिक ॲसिडची पातळी वाढणं आणि सातत्यानं ती वाढलेली राहणं आरोग्यासाठी घातक ठरतं. युरिक ॲसिडमुळे सांध्यांवर परिणाम होऊ लागतो आणि सतत अवघडल्यासारखी स्थिती तयार होते. याचं प्रमाण वाढत राहिलं तर भविष्यात संधीवाताचा त्रासही उद्भवण्याची शक्यता असते. युरिक ॲसिडच्या समस्येवर उपाय म्हणून अनेक प्रकारची औषधंही घेतली जातात. मात्र औषधं घेण्याची वेळच येऊ नये, यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. जाणून घेऊया असेच काही घरगुती उपाय आणि ते कऱण्याची योग्य पद्धत याविषयी.
युरिक ॲसिडच्या समस्येवर अक्रोड खाणं हा नामी उपाय आहे. जर तुम्हाला युरिक ॲसिड वाढत असल्याचं लक्षात आलं तर आहारात अक्रोडचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला जातो. अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडंट्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. या घटकांमुळे शरीरातील युरिक ॲसिड बाहेर काढायला मदत होते. युरिक ॲसिडची वाढलेली पातळी कमी करायलाही हे घटक मदत करतात.
युरिक ॲसिडची पातळी कमी कऱण्यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी दोन ते तीन अक्रोड खावेत. असं केल्याने काही दिवसांतच युरिक ॲसिडची रक्तातील पातळी कमी होईल आणि तुम्हाला पटकन आराम पडेल. अक्रोडमध्ये अनेक पोषक तत्त्वंदेखील असतात, ज्यांचा उपयोग शरीर बळकट करण्यासाठी होऊ शकतो.
अधिक वाचा - सावधान..! तुम्हीही भेसळयुक्त मध खात नाही ना?, 'या' 4 सोप्या पद्धतीनं तपासा घरबसल्या
युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी कांद्याचाही चांगला उपयोग होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कांद्यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहते. जेवणात सॅलड म्हणून कांद्याचा उपयोग करणं फायद्याचं ठरू शकतं. रिकाम्या पोटी कांद्याचा रस पिल्यामुळेही युरिक ॲसिडच्या पातळीवर नियंत्रण मिळवण्यात यश येतं.
अधिक वाचा - Foods That Lower Bad Cholesterol: बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खा हे हेल्दी फूड, हृदय नेहमी राहील निरोगी
वास्तविक, युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांश गोष्टी या आपल्या नेहमीच्या आहारातच समाविष्ट असतात. मात्र चुकीची जीवनशैली आणि आहारपद्धती यामुळे या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत. याचाच परिणाम शरीरावर होतो आणि युरिक ॲसिडची पातळी वाढायला सुरुवात होते. मात्र जर रोज चौरस आहार घेतला आणि त्या त्या ऋतुंमध्ये येणाऱ्या भाज्या आणि फळांचं सेवन केलं, तर युरिक ॲसिडची पातळी कायमस्वरूपी नियंत्रणात राहू शकते.
अर्थात, युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीच्या या सामान्य आणि घरगुती स्वरुपाच्या टिप्स आहेत. तुम्हाला युरिक ॲसिडशी संबंधित काही गंभीर समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे.