नवी दिल्ली: onion is very beneficial for weight loss: सध्याची लाईफस्टाइल (lifestyle) खूप धकाधकीची (very stressful) झाली आहे. या धकाधकीच्या आयुष्यात वजन वाढणं ही सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाच्या (Weight Gain) समस्येनं त्रस्त असलेले पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत लोकं वजन कमी करण्यासाठी (Lose Weight) सर्व प्रकारचे उपाय करत असतात. मात्र तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. काही लोक वजन कमी करण्यासाठी औषधं गोळ्याही खाण्यास सुरूवात करतात. मात्र, या गोळ्या तुमच्या आरोग्यासाठी (Health) घातक ठरू शकतात. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय करणं चांगलं ठरतं. घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या वाढत्या वजनावर (Weight Gain) नियंत्रण ठेवू शकता. दरम्यान कांदा (onion) वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया, वजन कमी करण्यासाठी कांद्याचे फायदे तसंच कांद्याचं सेवन करण्याची योग्य पद्धत.
वजन कमी करण्यासाठी रोज कच्चा कांदा खा
अधिक वाचा- 20 मिनिटांत बनवा अंड्याची Tasty चटणी
वजन कमी करण्यासाठी किती प्रभावी आहे कांदा
कांद्यामध्ये विशेष प्रकारचे फ्लेव्होनॉइड असते, जे मेटाबॉलिज्म बूस्ट करते. कांद्यामध्ये फायबर देखील भरपूर असते. यासोबतच कांद्यात कॅलरीजही कमी असतात, ज्यामुळे वजन वाढू देत नाही. इतकंच नाही तर कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, कोलेस्ट्रॉल, फॉस्फरस, झिंक, आयर्न यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे कांद्याचे सेवन केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं.
कांदा कसा खावा
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कच्चा कांदा सॅलडच्या स्वरूपात खा. कच्चा कांदा खाल्ल्याने हॅलिटोसिस होण्याची शक्यता असते, मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कच्च्या कांद्यावर मीठ शिंपडा आणि ते जेवणासोबत सॅलड म्हणून खा.
कांद्याचा रस देखील पिऊ शकता
वजन कमी करण्यासाठी कांद्याचा रस देखील पिऊ शकतो. यासाठी 2 कांदे घ्या आणि थोडं पाण्यात उकळा. नंतर कांदा थोडा थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर ते मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता ते एका ग्लासमध्ये घेऊन लिंबू आणि मीठ घालून प्या. याचा फायदा होईल.
(अस्वीकरण: या लेखातील टिप्स आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)