केसांच्या समस्येवर कांद्याचे तेल उपायकारक, घरी बनवणे अतिशय सोपे

केस गळण्याची समस्या ही सामान्य झाली आहे. यापासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करत आहेत. परंतु, कांद्याचे तेल हा केसगळतीवर उत्तम उपाय होऊ शकतो. 

Hair Fall remedy
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

थोडं पण कामाचं

 • कांद्याचे तेल केसांच्या अनेक समस्यांवर उपायकारक
 • कोंडा नष्ट करण्यापासून ते केस मजबूत करण्यापर्यंत हे फायदेशीर 
 • जाणून घ्या घरी कसे तयार कराल कांद्याचे तेल 

सुंदर आणि लांब केस तर सर्वांनाच हवे असतात. परंतु, बदलती जिवनशैली व आहाराच्या सवयींमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढत आहे. केस गळती थांबवण्यासाठी आपण अनेक उत्पादनांचा वापर करत असतो. परंतु, त्याचाही काही फायदा होत नाही. कांद्याचे तेल हे केस गळती थांबवून केसांच्या वाढीला मदत करते.

कांद्याचे तेल नियमित लावल्याने केस दाट, मजबूत व सुदृढ राहतात. केसांचे मूळ मजबूत करण्यासोबतच कोंडा दूर करण्यास सहाय्यक ठरते. विशेष म्हणजे, तुम्ही हे स्वतः तयार करू शकता. चला तर मग, आपण हे बनवण्याची प्रकिया पाहूया.

असे बनवतात कांद्याचे तेल

 1. प्रथम मिक्सरमध्ये कांद्याचा रस काढून घ्यावा. त्याची पेस्टही वापरू शकता. 
 2. आता एका तव्यावर अर्धे तेल व अर्धी कांद्याची पेस्ट गरम करून ते मिश्रण थंड करावे  
 3. थंड झाल्यावर त्या मिश्रणाला गाळणी किंवा सुती कपड्याने गाळून घ्यावे
 4. तुम्ही हे तेल सहा महिने वापरू शकता

कांद्याच्या तेलाचे फायदे

 1. कांद्याच्या रसात केसांसाठी उपयुक्त सल्फरचे प्रमाण अधिक असते
 2. सर्व प्रकारच्या केस सौंदर्य प्रसाधनांत या रसाचा उपयोग केला जातो 
 3. केसातील कोंडा कमी करण्यात याची मदत होते 
 4. याने केस लांब दाट व मजबूत होतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी