Orange Side Effects:आरोग्यासाठी फायदेशीर आहे संत्रा, पण या लोकांसाठी ठरू शकते घातक

Orange Side Effects: संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) आणि पाणी चांगले असते. यामुळे संत्रा शरीराला (body) हायड्रेट ठेवत असते तसेच प्रतिकारशक्ती (Immunity)वाढवत असते. संत्री नक्कीच फायदेशीर आहेत, परंतु ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते, त्याचप्रमाणे संत्री खाल्ल्यानेही नुकसान होऊ शकते.

Eating oranges can be dangerous for these people
संत्रा खाणं या लोकांसाठी ठरू शकते घातक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी संत्री खाणे टाळावे.
  • दिवसातून 4-5 संत्री खात असाल तर शरीरातील फायबरचे प्रमाण थोडे वाढेल.
  • ्हिटॅमिन-सीचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ, उलट्या होणे, झोप न लागणे आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

नवी दिल्ली : हिवाळा (winter) येताच बरोबर या केशरी रंगाच्या फळामुळे बाजारपेठा रंगत असतात. आंबट-गोड असलेलं हे फळ  जवळजवळ सर्वांनाच आवडत असते. विशेषत: वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करणारे लोक संत्राला (Orange) पहिली पसंती देतात. त्याचे कारणही तसेच आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) आणि पाणी चांगले असते. यामुळे संत्रा शरीराला (body) हायड्रेट ठेवत असते तसेच प्रतिकारशक्ती (Immunity)वाढवत असते. संत्री नक्कीच फायदेशीर आहेत, परंतु ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते, त्याचप्रमाणे संत्री खाल्ल्यानेही नुकसान होऊ शकते. कारण संत्र्यामध्ये कॅलरीज, पाणी, प्रथिने, कार्ब्स, साखर, फायबर आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, ते जास्त खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.( Orange Side Effects: Orange is beneficial for health, but it can be dangerous for these people)

अधिक वाचा  : भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायूची भरती

संत्रा खाण्याचे फायदे

बाजारात मुबलक प्रमाणात येणारी संत्री-मोसंबी उन्हाळ्यात खाल्लस खूप फायदा होत असतो. आंबट गोड चवीच्या संत्र्यांमुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते. फायबर, लोह, क जीवनसत्त्व यांसारखे अनेक घटक असणाऱ्या संत्र्यामुळे पोट साफ होणे, त्वचा नितळ होणे यांसारख्या इतर तक्रारीही दूर होतात. संत्र्यात अमिनो अ‍ॅसिड, फायबर, कॅल्शियम, आयोडीन, फॉस्फरस, सोडियम, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि ब यांसारखे उत्तम घटक आढळतात. या घटकांमुळे उच्च रक्तदाबासाठी संत्रा गुणकारी मानला जातो. किडनी स्टोनच्या समस्येमध्ये संत्री आणि त्याचा रस रोज सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

तुम्ही खूप संत्री खाल्ल्यास काय होते?

जर तुम्ही दिवसातून 4-5 संत्री खात असाल तर  शरीरातील फायबरचे प्रमाण थोडे वाढेल. त्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे आणि मळमळ यासारख्या समस्या सुरू होतात. व्हिटॅमिन-सीचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ, उलट्या होणे, झोप न लागणे आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.

अधिक वाचा  : आता मेटामधील अनेकांना आठवड्याभरात मिळणार नारळ

एका दिवसात किती संत्री खाणे आहे योग्य

 जास्त संत्रा खाल्लाने काही गंभीर प्रकरणांमध्ये, व्यक्तीला उलट्या आणि छातीत जळजळ होऊ शकते. पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेल्या लोकांनी संत्री खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संत्र्यामध्ये पोटॅशियमची पातळी कमी असते, परंतु जर शरीरात आधीच जास्त पोटॅशियम असेल तर ते हायपरक्लेमिया नावाची संभाव्य गंभीर स्थिती होऊ शकते. संत्री अम्लीय असतात, ज्यामुळे गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) ग्रस्त लोकांमध्ये पोटात जळजळ होऊ शकते. जीईआरडीचा त्रास असलेल्यांनी संत्री खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

यावेळी संत्री खा

दिवसभरात संत्री खाणे जास्त फायदेशीर मानले जाते. जेवणाच्या एक तास आधी किंवा एक तासानंतर तुम्ही संत्री खाऊ शकता, यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल.

कोणी खाऊ नयेत 

  • ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी संत्री खाणे टाळावे.
  • लहान मुलांनी जास्त संत्री खाऊ नयेत, कारण त्यांना पोटदुखी होऊ शकते.
  • गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनीही जास्त संत्री खाऊ नयेत.
  • हृदयरोग्यांनी हिवाळ्यात संत्र्याचे सेवन कमी करावे.


(Disclaimer:लेखात नमूद केलेले सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशासाठी आहेत.  व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून ह्या घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी