मुंबई: संत्रे हे आंबट-गोड चविष्ट फळ आहे. हे फळ थंडीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात येते. व्हिटामिन सीने भरपूर असलेले संत्रे केवळ इम्युनिटी वाढवत नाही तर वजन घटवण्यातही फायदेशीर ठरते. संत्र्याला सुपरफूड म्हटले जाते. यामुळे हाडेही मजबूत होतात. वजन कमी होते आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. संत्र्याच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होती. oranges help in weight loss
अधिक वाचा - हॉटेल रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर लावणे बेकायदा
संत्र्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जे मेटाबॉलिक वाढवण्यास आणि पाचन तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतात.सोबतच यात कॅलरी नसल्यासारख्याच असतात. वजन कमी करण्यात हे फायदेशीर ठरते. त्यामुळे दररोज संत्र्याचे सेवन केले पाहिजे.
व्हिटामिन ए, बी, सी, कॅल्शियम, आयोडिन, फायबर आणि अनेक मिनरल्सनी भरपूर संत्रे इम्युनिटी वाढवण्याचे काम करतात. ज्या लोकांना लवकर आजार होतात त्यांच्यासाठी संत्रे अतिशय फायदेशीर आहे.
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यात बीटा कॅरोटिन आणि अॅस्कॉर्बिक अॅसिड असते जे कॅन्सरचा धोका कमी कऱण्यास फायदेशीर असते.
अधिक वाचा - प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहिलं जायतंय : मोहन भागवत
ज्या लोकांना ब्ल प्रेशरचा त्रास आहे त्यांनी दररोज संत्रे खाल्ले पाहिजे. याशिवाय तुम्ही संत्र्याचा ज्यूसही पिऊ सकता. यामळे ब्लड प्रेशर सामान्य राहण्यास मदत होते.