लठ्ठपणापासून तुम्हाला सुटका देऊ शकतात पपईच्या बिया, आठवड्याभरात दिसेल परिणाम, असा करा वापर

तब्येत पाणी
Updated Apr 08, 2021 | 12:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight Loss Tips: लोक पपई खाल्ल्यानंतर अनेकदा त्याच्या बिया टाकून देतात. मात्र या बिया आपल्या आरोग्यासाठी फार चांगल्या आहेत. पपईच्या बिया एका आठवड्याभरात आपले बरेच वजन कमी करू शकतात. जाणून घ्या कसा करायचा वापर.

Papaya seeds
पपईच्या बिया दूर करेल लठ्ठपणा 

थोडं पण कामाचं

  • वजन कमी करण्यासाठी अशा वापरा पपईच्या बिया
  • त्वचा होईल आणखी चमकदार
  • पपई आपल्या पचनसंस्थेला करते मजबूत

Weight Loss Tips: लोक पपई (Papaya) खाल्ल्यानंतर अनेकदा त्याच्या बिया (seeds) टाकून देतात. मात्र ज्या बिया आपण कचरा (waste) समजून फेकून देत आहात त्या आपल्या आरोग्यासाठी (health) एखाद्या वरदानाइतक्याच (boon) चांगल्या आहेत. पपईच्या बिया (papaya seeds) एका आठवड्याभरात आपले बरेच वजन कमी (weight loss) करू शकतात. इतकेच नाही, तर या बियांचे इतरही अनेक फायदे (benefits) आहेत. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी आणि इतर रोगांपासून (diseases) सुटका (rid) मिळवण्यासाठी कसा करायचा या बियांचा वापर.

वजन कमी करण्यासाठी अशा वापरा पपईच्या बिया

पपईत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि अतिशय कमी कॅलरी असतात. पपईत आढळणाऱ्या एंझाईम्स फक्त वजनच कमी करत नाहीत, तर वाईट असलेले कॉलेस्ट्रॉलही कमी करतात. वजन कमी करण्यासाठी आपण रोज 10 ते 15 दिवस एक चमचा पपईच्या वाळवलेल्या बियांच्या पावडरीचे सेवन करू शकता. एका दिवसात 5 ते 8 ग्रॅम बियांचेच सेवन करा. हे आपण लिंबाच्या रसासोबत किंवा सलाडच्या वर घालून खाऊ शकता.

त्वचा होईल आणखी चमकदार

पपईच्या बियांमध्ये अँटीएजिंग गुण असतात जे आपल्या त्वचेतील तजेला कायम राखण्यासोबतच सुरकुत्याही कमी करण्यात मदत करतात. या बिया पपईसोबतच चावून चावून खा. यानंतर पाणी प्या. असे केल्याने आपल्या त्वचेवर वयाच्या आधीच सुरकुत्या किंवा फाईन लाईन्स दिसणार नाहीत.

पपई आपल्या पचनसंस्थेला करते मजबूत

पपईच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात पचन एन्झाईम्स असतात जे प्रथिनांचे विघटन करण्यासाठी मदत करतात. यामुळे नैसर्गिक पचनक्रियेत मदत होते. आरोग्यपूर्ण पचनासाठी पपईच्या बिया उन्हात वाळवून त्या मिक्सरमध्ये वाटून त्याचे चूर्ण करा. आता हे चूर्ण दररोज कोमट पाण्यासोबत घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी